जळगाव | दि.०७ ऑगस्ट २०२४ | शहरातील मेहरुण तलाव परिसरात तसेच वाहनात एका १५ वर्षीय तरुणीवर वेळोवेळी २० वर्षीय तरुणाकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलायं. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षण घेत असलेल्या या १५ वर्षीय तरुणीने एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. मार्च ते जुलै २०२४ दरम्यान वेळोवेळी मेहरुण तलाव येथील ट्रॅक जवळ आणि वाहनात वेळोवेळी फोनद्वारे बोलावून फोन मध्ये लैंगिक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देत वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सातत्याने होणाऱ्या जाचाला कंटाळून तरुणीने कुटुंबीयांना माहिती दिली.
त्यानुसार मंगळवारी दि. ६ ऑगस्ट रोजी संशयित आरोपी स्नेह किशोर लाठीग्रा (किसन सोनी, वय २०, रा. शांती नगर, जळगाव) याच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहेत.