जामनेर | दि. ०५ जुलै २०२४ | तालुक्यातील पहुर येथे साफसफाई करत असताना स्वच्छता करण्यासाठी औषधाची बाटली उघडताना तोंडात विष गेल्याने सफाई कर्मचाऱ्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजय दिलीप गोयर (वय-३९, रा. पहूर ता.जामनेर) असे मयत झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे नाव आहे. विजय दिलीप गोयर हे आई लिलाबाई, पत्नी राधिका, दोन भाऊ आणि दोन मुलं असा यांच्यासह पहूर येथे वास्तव्याला होते. गेल्या १५ वर्षांपासून स्वच्छता कर्मचारी म्हणून कामाला होते. दरम्यान रविवारी ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास स्वच्छतेसाठी लागणारी औषधाची बाटली उघडत असताना अचानकपणे औषध हे तोंडात गेले.
त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. ही बाब लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने खाजगी वाहनातून दाखल करत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी ५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.