• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळ येथील गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 4, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
भुसावळ येथील गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : पोलीस प्रशासनाने संघटीत गुन्हेगारीच्या कायद्याअंतर्गत एमपीडीएद्वारे भुसावळ शहरातील आतीश रवींद्र खरात (वय २५, रा. समता नगर, भुसावळ) याच्या विरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आतीश खरात याला एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. त्याला ठाणे येथील कारागृहात एक वर्ष स्थानबध्द करण्यात येणार आहे.

आतिश खरात याचा दि. ८ एप्रिल २०२४ रोजी हद्दपार प्रस्ताव पाठवण्यात आला होता. चौकशी दरम्यान अतिशने दि. ११ एप्रिल रोजी दखलपात्र गुन्हा केल्यामुळे त्याचे विरुद्ध एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव भुसावळ शहर पोलीस स्टेशनने पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केला होता. या प्रस्तावावर आता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मान्यता दिली आहे.

आतिश खरात याच्यावर भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे तर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे आर्म ॲक्ट व इतर कलमानुसार १ गुन्हा दाखल आहे. भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रस्तावावर कामकाज केले. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील दामोदरे, युनूस शेख यांनी कार्यवाही केली.

Tags: CrimeJalgaon
Next Post
जुन्या जळगावात युवकाची गळफास घेत आत्महत्या

जुन्या जळगावात युवकाची गळफास घेत आत्महत्या

ताज्या बातम्या

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add