जळगाव | दि.०३ ऑगस्ट २०२४ | कविवर्य ना. धों. महानोर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सर्व महाराष्ट्राला ज्या पांडुरंगाचे वेड आहे, वारकरी परंपरा ही महाराष्ट्राची ओळख आहे, त्या मराठी कवी कुळाचा सर्वांगाने शोध घेणा-या संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून कवी महानोर दादा यांना आदरांजली रविवारी ४ ऑगस्ट रोजी छ. संभाजीराजे नाट्यगृहात सायं. ६.३० वा अर्पण करण्यात येणार आहे.
संजिवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन जळगावची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना नारायण बाविस्कर यांची तर दिग्दर्शन हर्षल पाटील यांचे असून निर्मिती प्रमुख विनोद पाटील व मंगेश कुलकर्णी हे आहेत. संगीत संयोजन सुदिप्ता सरकार व मंजुषा भिडे यांचे आहे. तिर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कार्यक्रमात गोविंद मोकाशी, भूषण गुरव, अंजली धुमाळ, डॉ. सोनाली महाजन, रजनी पवार, अनुषा महाजन, आराधना पाटील, शशिकांत महानोर, राहुल कासार, योगेश पाटील, वरुण नेवे हे कलावंत सहभागी होणार आहेत.
हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला असून रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भवरलाल व कांताबाई जैन फाऊंडेशनचे अशोक जैन व परिवर्तन प्रमुख अनिल कांकरिया, अनिश शहा, नंदलाल गादिया, किरण बच्छाव, अमर कुकरेजा, छबिराज राणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.