• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नेरी शिवारातील अपघातात जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 2, 2024
in जळगाव जिल्हा
0
नेरी शिवारातील अपघातात जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू

जामनेर | दि. ०२ ऑगस्ट २०२४ | नेरी गावाजवळ  जामनेर फाट्यापाशी कुत्रा आडवा आल्यामुळे तालुक्यातील पहूर कसबे येथील २७ वर्षीय तरुणाचा नोकरीवरून घरी जात असताना दि. ३१ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास भीषण अपघात होऊन त्यात तो गंभीर जखमी झाला होता. गुरुवारी दि. १ ऑगस्ट रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

गणेश ज्ञानेश्वर बनकर (२७, रा. पहूर ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, ४ वर्षीय मुलगा, आई, वडील, भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. पहूर कसबेतील रहिवासी व अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर बाळकृष्ण बनकर यांचा चिरंजीव गणेश बनकर हा जळगाव येथे एका गॅस एजन्सीला कामाला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी दि. ३१ जुलै रोजी सकाळी घरून दुचाकीने जळगावला गेला होता. संध्याकाळी कामावरून घरी परतत असताना सात वाजेच्या सुमारास जळगाव-छत्रपती संभाजी नगर रस्त्यावर नेरी येथे जामनेर फाट्याजवळ श्वानामुळे दुचाकीला अपघात झाला.

यात गणेश याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. घटनेची संबंधित पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.

Tags: accidentapghatCrimeJamnerpahur
Next Post
लिफ्ट मागण्याचा बहाणा करीत चौघांनी कार चालकाला लुटले

लिफ्ट मागण्याचा बहाणा करीत चौघांनी कार चालकाला लुटले

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add