जळगाव (प्रतिनिधी) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरातील नेरी नाका येथे शहराच्या माजी महापौर सीमाताई भोळे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी माजी उपमहापौर सुनील खडके, ज्योतीताई निंभोरे, मुकुंद मेटकर, अजित राणे, प्रकाश पंडित, परेश जगताप, प्रल्हाद सोनवणे, सुनील सरोदे, बापू कुमावत, चेतन तिवारी, गणेश वाणी, चित्राताई मालपाणी यांच्यासह परिसरातील नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.