• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 9, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगावातील महादेव हॉस्पिटलने हृदयविकार उपचार क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांच्या टीमने ६५ वर्षीय गंभीर रुग्णावर अत्याधुनिक ड्युअल-चेम्बर परमानेंट पेसमेकरचे यशस्वी रोपण करून त्याला नवजीवन दिले आहे. अत्यंत संवेदनशील व कौशल्यपूर्ण मानली जाणारी ही प्रक्रिया कोणत्याही गुंतागुंतीशिवाय यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.

सदर रुग्ण हृदयाच्या वहन दोषामुळे (कंडक्शन डिसऑर्डर) त्रस्त होता. हृदयाची गती अत्यंत मंद झाल्याने त्याला वारंवार चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे तसेच तीव्र अशक्तपणा जाणवत होता. या गंभीर लक्षणांमुळे त्याच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत होता.

हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्डियोलॉजी विभागाच्या टीमने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया पार पाडली. स्थानिक भूल देऊन ‘मिनिमली इन्व्हेसिव्ह ट्रान्सव्हेनस’ पद्धतीने गळ्याच्या हाडाखालील शिरेमधून दोन पेसिंग लीड्स हृदयाच्या उजव्या अलिंद (राइट एट्रियम) व उजव्या वेंट्रिकलमध्ये अचूकपणे बसविण्यात आल्या. त्यानंतर या लीड्स छातीच्या वरच्या भागात त्वचेखाली बसवलेल्या पल्स जनरेटरशी जोडण्यात आल्या.

हे अत्याधुनिक यंत्र हृदयाच्या विद्युत हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार विद्युत लहरी पाठवते. त्यामुळे हृदयाचे दोन्ही कप्पे योग्य समन्वयाने कार्य करतात आणि हृदयाची गती नियंत्रित राहण्यास मदत होते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत तातडीने लक्षणीय सुधारणा दिसून आली. हृदयाचे ठोके सामान्य झाल्याने रुग्णाची प्रकृती स्थिर असून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शनासह त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

डॉ. वैभव पाटील म्हणाले की, “कम्प्लीट हार्ट ब्लॉक, हाय-ग्रेड एट्रिओव्हेंट्रिक्युलर (एव्ही) ब्लॉक आणि सिक सायनस सिंड्रोम यांसारख्या गंभीर हृदयविकारांमध्ये ड्युअल-चेम्बर पेसमेकर अत्यंत प्रभावी उपचार ठरतो. वेळेवर निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास अशा रुग्णांना पूर्णपणे सामान्य व सक्रिय जीवन जगता येते. नागरिकांनी वारंवार चक्कर येणे, अचानक थकवा जाणवणे, बेशुद्ध पडणे किंवा नाडीचे ठोके कमी होणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. अशा वेळी तातडीने ईसीजी तपासणी करून हृदयविकार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.”

या यशस्वी प्रक्रियेत डॉ. सहर हमदुले (जनरल सर्जन), डॉ. सैयद झीशान (एस.आर. डीएम कार्डिओलॉजी), डॉ. आकाश पवार (जनरल मेडिसिन) आणि डॉ. केदारनाथ देशमुख (इमर्जन्सी मेडिसिन) यांचे विशेष सहकार्य लाभले.

महादेव हॉस्पिटलच्या या यशस्वी कामगिरीमुळे जळगाव जिल्ह्यात अत्याधुनिक हृदयविकार उपचारांची उपलब्धता अधिक सक्षम झाल्याचे बोलले जात आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय टीमच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


 

Next Post
भुसावळात रविवारी रंगणार ‘नेवे-वाणी समाज मंडळा’च्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा थरार

भुसावळात रविवारी रंगणार ‘नेवे-वाणी समाज मंडळा’च्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा थरार

ताज्या बातम्या

पती जेवणासाठी बाहेर गेले असताना १८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
गुन्हे

पती जेवणासाठी बाहेर गेले असताना १८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

September 23, 2026
गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत* *गणेश फेस्टिवल पोस्टल नाईट कॅम्पला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खान्देश

गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत* *गणेश फेस्टिवल पोस्टल नाईट कॅम्पला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी
खान्देश

वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी

September 23, 2026
सेवा मंडळासमोरील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवरून महापौर दीपमाला काळे आक्रमक; मक्तेदाराला दूरध्वनीवरून धरले धारेवर..!
खान्देश

सेवा मंडळासमोरील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवरून महापौर दीपमाला काळे आक्रमक; मक्तेदाराला दूरध्वनीवरून धरले धारेवर..!

September 23, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

उसनवारीचे पैसे मागितलेच्या रागातून महिलेच्या गळ्यावर ब्लेडने वार; संतप्त नागरिकांकडून संशयिताला चोप 

September 23, 2026
पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध व्यावसायिकाचे दागिने लंपास
गुन्हे

पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध व्यावसायिकाचे दागिने लंपास

September 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add