• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 9, 2026
in आरोग्य
0
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावच्या ह.भ.प जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे यावल तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देत यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात आला आहे.

या मोहिमेअंतर्गत १० जूनपासून यावल तालुक्यातील २४ टप्प्यांमध्ये विविध गावांमध्ये नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरांमध्ये नेत्र विभागासोबतच इतर विविध विभागांतील रुग्णांचीही तपासणी केली जाणार असून आवश्यकतेनुसार आरोग्य मार्गदर्शन व उपचार दिले जाणार आहेत. तपासणीत मोतीबिंदू अथवा इतर नेत्रविकार आढळलेल्या रुग्णांना जळगाव येथील रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया व पुढील उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हे अभियान विशेष लाभदायी ठरणार आहे. या अभियानासाठी डॉ. एन. एस. आर्विकर व डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष टीम कार्यरत आहे. मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाचे समन्वयन डॉ. नि. तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावड, डॉ. निखिल चौधरी, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. उर्मी गायकवाड, डॉ. अनिष कांदळगावकर, डॉ. अभिजीत काकड, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रिया गोरे, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे आणि डॉ. अश्विनी काकडे हे तपासणी करणार आहेत.

रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, ग्रामीण भागातील गरीब व गरजू नागरिकांपर्यंत अत्याधुनिक आरोग्यसेवा पोहोचविणे ही संस्थेची सामाजिक बांधिलकी आहे. तपासणीपासून शस्त्रक्रिया व पुढील उपचारांपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आतापर्यंत विविध गावातील हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली असून शेकडो यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रियांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा स्पष्ट दृष्टी लाभली आहे. १० जूनपासून यावल तालुक्यात गावोगावी आयोजित शिबिरांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.


 

Next Post
जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयएएस आयुक्त; आदित्य जीवने यांची नियुक्ती

जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयएएस आयुक्त; आदित्य जीवने यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग
खान्देश

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग

September 22, 2026
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे
खान्देश

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच; महसूल सहाय्यकासह खासगी वकील एसीबीच्या जाळ्यात

September 22, 2026
भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात
खान्देश

भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात

September 22, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 22, 2026
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
कृषी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 22, 2026
जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड
खान्देश

जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

September 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add