जळगाव | दि. ०१ ऑगस्ट २०२४ | मुंबई येथे जिल्हा कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. कारागृह अधीक्षक, उपअधीक्षक यांच्या पदोन्नतीने बदलीचे आदेश गृह विभागाच्या उपसचिवांनी काढले.
त्यात राज्यातील विविध जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये सव्वा पाच वर्षांपूर्वी जळगाव कारागृहाचा कारभार संभाळणारे वांढेकर यांची मुंबई मध्यवर्ती कारागृहात अतिरिक्त अधीक्षक म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. त्यांचा पदभार जळगाव जिल्हा कारागृहाचे वरिष्ट तुरुंगाधिकारी गजानन पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.