जळगाव | दि.१८ जुन २०२४ | माजी केंद्रीय राज्यमंत्री एम. के. अण्णा पाटील यांना नवी दिल्ली येथे जागतिक ग्लोबल फ्युल अवार्ड देऊन सन्मानित केल्याबद्दल मंगळवारी जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात त्यांचा मानपत्र देत सन्मान करण्यात आला.
यावेळी पत्रकार भवन समितीचे विश्वस्त अशोक भाटिया पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, कार्याध्यक्ष पांडुरंग महाले, ग्रामीणचे अध्यक्ष भिका चौधरी, मंत्रालय विधिमंडळ पत्रकार संघाचे सदस्य कमलाकर वाणी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री पाटील म्हणाले की पत्रकार भवनातील सत्कार हा प्रेमाचा सत्कार असून आपल्या घरच्या माणसांनी केलेल्या सत्कारअसल्यामुळे याचे महत्त्व वेगळेच आहे. आपल्यातील जिव्हाळा कायम असून असाच यापुढे ही राहावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.