जळगाव | दि.२० जुन २०२४ | विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणुकीचे २६ जून रोजी मतदान होत आहे. दरम्यान मतदान कसे कराचे यासंदर्भातील सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.
१. मतदान करणेसाठी आपणास मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेले केवळ जांभळ्या रंगाचे स्केच पेन वापरण्यात यावे. इतर कुठलाही पेन, बॉलपेन किंवा पेन्सिलचा वापर करु नये.
२. आपणांस आपली प्रथम पसंती / प्राधान्य म्हणून निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोरील ‘order of preference’ (पसंती क्रमांक दर्शवावा) या रकान्यात “१” अंक लिहून मतदान करावे.
३. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या एकापेक्षा जास्त असली तरीही “१” अंक हा केवळ एका उमेदवाराच्या नावासमोर लिहावयाचा आहे.
४. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी तुमच्याकडे निवडणूक लढविणारे जेवढे उमेदवार आहेत तेवढे पसंतीचे पर्याय आहेत.
५. उर्वरित उमेदवारांसाठीची तुमची पुढील पसंती त्या उमेदवाराचे नावासमोर पुढील अंक २, ३, ४, इ. लिहून दर्शवावी.
६. कोणत्याही एका उमेदवारासमोर केवळ एकच अंक दर्शवावा. एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर सारखाच अंक दर्शवू नये.
७. प्राधान्यक्रम केवळ १, २, ३, इ. प्रमाणे अंकामध्येच दर्शविण्यात यावा आणि कोणत्याही परिस्थितीत एक, दोन, तीन, इ. प्रमाणे अक्षरात दर्शवू नये.
८. आकडे केवळ भारतीय अंकांच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपात म्हणजे १, २, ३ इ. प्रमाणे किंवा रोमन स्वरूपात I, II, III इ. प्रमाणे किंवा भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीतील मान्यताप्राप्त असलेल्या कुठल्याही भारतीय भाषेत दर्शवू शकता.
९. मतपत्रिकेवर सही किंवा आद्याक्षर किंवा तुमचे नाव किंवा कुठलाही शब्द लिहू नका. तसेच तुमच्या अंगठ्याचा ठसा देखील उमटवू नका.
१०. मतपत्रिकेवर प्राधान्यक्रम दर्शविण्यासाठी बरोबरची खुण जसे “” किंवा चुकीची खुण जसे ” x ” करु नका. अशी मतपत्रिका बाद / रद्द ठरविली जाईल.
११. तुमची मतपत्रिका वैध होण्यासाठी, तुम्ही, उमेदवारांपैकी एकासमोर “१” अंक लिहून तुमची प्रथम पसंती दर्शवावी. इतर प्राधान्य केवळ ऐच्छिक आहेत आणि अनिवार्य नाहीत.
-जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव