• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरीच्या गीत गोविंद मैफीलीत रसिक चिंब भिजले

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 17, 2024
in मनोरंजन
0
गोदावरीच्या गीत गोविंद मैफीलीत रसिक चिंब भिजले

जळगाव | दि.१७ जुन २०२४ | गोदावरी संगीत महाविद्यालयात ’गित गोविंद’ या सुरेल मैफिलीच्या दे रे कान्हा’, ’आज गोकुळात रंग, अरे मन मोहना’ या सारख्या गीतांनी रसिक चिंब भिजले. गितांना मन प्रसन्न करणारे नृत्य व हार्मोनियम आणि तबला वादनाची सुरेल जोड मिळाल्याने मैफील बहरत गेली.

गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजीत मैफीलीचे उदघाटन दिपप्रज्वलनाने झाले. अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.सुशिल अत्रे, विजय कृष्णकुमार (मुंबई), श्रीमती गोदावरी पाटील, संचालिका डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या पद्मजा नेवे, कथक विभाग प्रमुख डॉ. महिमा मिश्रा, प्रविण महाजन, देवेंद्र गुरव, सुशिल महाजन, केंद्र व्यवस्थापक राजु पाटील व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या कथक विभाग प्रमुख डॉ. महिमा मिश्रा अय्यंगार लिखीत महाराज कृष्णकुमार : व्यक्तीत्व और कृतित्व या पुस्तकाचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळस महाराज कृष्णकुमार यांचे सुपुत्र विजय कृष्णकुमार (मुंबई) यांची उपस्थिती लाभली. यांनतर कथक विभागाच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण गोविंद हरे मुराली हे बहारदार नृत्य सादर केल तर, निरतत थुंग विरजु महाराज यांची बंदीश सादर केली. ’घागर घेवून निघाली’ ही गवळण तर किती सांगू मी सांगु कुणाला’ यांनतर नंद किशोरा, झुलतो बाई रास झुला, गोकुळात रंग इ गिते अनुक्रमे राजस्वी चव्हाण, नमस्वी पाटील, आरुषी अदनाने पूर्वी जगताप,रिया वर्मा, कनकश्री अय्यंगार, समृध्दी जोशी, गित साळवे व मित साळवे या चिमुकलींनी आपल्या मधुर आवाजात सादर केली.

कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्या पद्मजा नेवे यांनी केले. सुत्रसंचालन वैष्णवी जोशी व यशश्री ठाकुर यांनी तर आभार प्रदर्शन भुषण खैरनार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजु पाटील, अनंता साठे, किशोर चौधरी, ईश्वर पाटील, भुषण पाटील यांनी परिश्रम घेतले.


Next Post
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group