जळगाव, दि.१८ – रेडक्रॉसचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्यविषयक तज्ञ मान्यवरांचे योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देश्याने रेडक्रॉसमार्फत व्याख्यानमाला सुरु करण्याची संकल्पना पुढे आली.
या व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या सयुंक्त विद्यमाने यवतमाळ येथील आयुर्वेदिक सोरायसीस रिसर्च फौंऊडेशन व उपचार केंद्राचे संचालक डॉ.रुपेश खंदाडे हे सोरायसीस या आजारावर मार्गदर्शन करणार आहेत.
सोरायसीस हा आजार अनेक नागरिकांना असून या आजाराबाबत आणि उपचाराबाबत अजून हि नागरिकांना योग्य माहिती नाही. परिणामी अनेक नागरिक उपचारापासून वंचित राहतात तर काही अनावश्यक खर्चाला हि बळी पडतात.
तरी या आजारात घ्यायालची काळजी व करावयाचे उपचार या उद्देश्याने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत असून उपस्थित नागरिकांचे शंकांचे निरसन हि करणार आहे. सदर व्याख्यानाचे आयोजन रविवार दिनांक १९ मे २०२४ रोजी रोटरी भवन, मायादेवी नगर, जळगाव