जळगाव, दि.१३ – जागतिक परिचारिका दिनानिमित्त जळगाव मधील हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट अँड पॅरामेडिकल व गोदावरी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने सन्मान सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले होते या सन्मान सोहळ्यात ४० परिचारिकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कुठल्याही आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या सेवेत परिचारिका या कायम अग्रेसर असतात तसेच रुग्णांना बरे करण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी परिचारिकांचा सिंहाचा वाटा असतो. त्यामुळे परिचारिकांचा सन्मान व्हावा यासाठी जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट अँड पॅरामेडिकल तसेच गोदावरी फाउंडेशन यांच्यावतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सन्मान सोहळ्यात शोभा सुपर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल यांनीही खारीचा वाटा उचलला.
केमिस्ट भवन या ठिकाणी पार पडलेल्या या सन्मान सोहळ्यात माजी महापौर विष्णू भंगाळे,विश्व प्रभा हॉस्पिटलच्या डॉ सीमा राजेश पाटील, रेमंड समूहाचे सुनील पाटील, स्वप्न साकार फाउंडेशनचे अविनाश काळे,उज्वला टोकेकर यांच्यासह हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालीका भारती काळे पाथरवट यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर स्वाती सोनवणे,उज्वला टोकेकर आदिनी परिश्रम घेतले. तर सुञसंचालन सोनम कपोते यानी केले.