• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चाळीसगावच्या चव्हाण दाम्पत्याच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक

पितृछत्र हरपलेल्या दुर्गाच्या लग्नासाठी आ.मंगेश चव्हाण व प्रतिभा चव्हाण यांनी दिला मदतीचा हात

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 28, 2024
in सामाजिक
0
चाळीसगावच्या चव्हाण दाम्पत्याच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक

जळगाव, दि.२८ – डोळ्यादेखत मुलीचे हात पिवळे होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पित्याने लग्न महिन्यावर असतानाच आजारपणात डोळे मिटले. होती नव्हती तेवढी जमापुंजी त्यांच्या आजारपणातच खर्च झाल्याने आता मुलीच्या लग्नाचा खर्च भागविणार तरी कसा, या विवंचनेत संपूर्ण परिवार हातावर हात धरून बसला. आडगाव (ता.चाळीसगाव) येथील एका गरीब कुटुंबावर गुदरलेला सदरचा बाका प्रसंग शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण यांच्या कानी पडला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर कुटुंबाला आधार देण्याचा निर्णय घेतला. पितृछत्र हरपलेल्या दुर्गाच्या लग्नाची वरात दारी येत नाही, तोपर्यंत एक हजार वऱ्हाडींच्या पंगतीसाठी लागणारा किराणा सामान त्यांच्या घरी पाठवूनही दिला.

मुलीचे लग्न तोंडावर असताना काबाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकणारे आडगावचे रहिवासी बापू रामदास हांबरे (गोपाळ) यांचे काही दिवसांपूर्वीच आजारपणामुळे अकाली निधन झाले. पत्नी, तीन मुली व एक लहान मुलगा असा परिवार असणाऱ्या बापू यांची लहान मुलगी कु.दुर्गा हिचे लग्न येत्या २ मे रोजी ठरले असून, लग्न महिन्यावर आलेले असताना दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबावर कोसळला. बापूंच्या उपचारासाठी दवाखान्याचा मोठा खर्च करावा लागल्याने गोपाळ कुटुंबाच्या पुढे दुर्गाचे ठरलेले लग्नं कसे पार पाडावे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला.

गोपाळ कुटुंबाची ही दुःखद कथा चाळीसगावातील शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण यांना कळाली. त्यानंतर त्यांनी सदर कुटुंबाला आधार देण्याचा निर्णय घेतला. आ. मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने कु.दुर्गाच्या लग्नातील एक हजार वऱ्हाडी लोकांच्या पंगतीसाठी लागणारा जेवणाचा किराणा बाजार घरपोच सुपूर्द देखील करण्यात आला. पतीच्या निधनाचे दुःख व तोंडावर आलेले मुलीचे लग्न या विवंचनेत असलेल्या त्या मायमाऊलीला शिवनेरी फाऊंडेशच्या मदतीमुळे मोठा आधार मिळाला आहे. एका गरीब शेतमजूर कुटुंबाच्या मदतीला संकटकाळी धाऊन गेल्याने आमदार मंगेशदादा चव्हाण व प्रतिभा चव्हाण यांच्या दातृत्वाचे मोठे कौतुक सर्वत्र होत आहे.

Next Post
चार कामे सांगा म्हणत रक्षा खडसेंना कोचूर येथे ग्रामस्थांचा विरोध

चार कामे सांगा म्हणत रक्षा खडसेंना कोचूर येथे ग्रामस्थांचा विरोध

ताज्या बातम्या

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group