• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चार कामे सांगा म्हणत रक्षा खडसेंना कोचूर येथे ग्रामस्थांचा विरोध

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 29, 2024
in राजकीय
0
चार कामे सांगा म्हणत रक्षा खडसेंना कोचूर येथे ग्रामस्थांचा विरोध

रावेर, दि.२९ – भाजपच्या उमेदवार व विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचा रविवारी रावेर तालुक्यात प्रचार दौरा होता. पदाधिकरी व कार्यकर्त्यांसह खासदार खडसे कोचूर येथे आल्या असता येथील काही ग्रामस्थांनी त्यांना चार विकास कामे सांगा म्हणत विरोध केला. त्यामुळे त्यांना आल्या पावली माघारी फिरण्याची वेळ अली.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2024/04/VID-20240429-WA0005.mp4

भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या दहा वर्षांपासून रावेर लोकसभा मतदार संघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. तिसऱ्यांदा त्यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. रविवारी रावेर तालुक्यात त्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी आल्या होत्या. कोचुर खुर्द येथे आल्या असता काही ग्रामस्थांनी त्यांना दहा वर्षात केलीली चार कामे सांगा म्हणत रोष व्यक्त केला. त्यामुळे खासदार खडसे निरुत्तर झाल्या. व आल्या पावली माघारी फिरण्याची त्यांच्यावर वेळ अली.

यावेळी सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत घालत त्यांना थांबवले. याबाबतचा व्हिडीओ रविवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होता. दरम्यान चोपडा तालुक्यातही एक ठिकणी काही शेतकऱ्यांनी त्यांना विरोध केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर रामनवमीच्या मिरवणुकीवेळी एका गावात त्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत थेथून काढता पाय घ्यावा लागल्याची घटना घडली होती. खासदार रक्षा खडसे यांना ठिकठिकाणी नागरिकांकडून होणारा विरोध पाहता त्यांच्यबद्दल मतदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती.

Next Post
शिवाजीनगर परिसरात महायुती उमेदवार स्मिताताई वाघ यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवाजीनगर परिसरात महायुती उमेदवार स्मिताताई वाघ यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add