• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मतदार संघात “स्मार्ट व्हिलेज” गाव योजना राबविणार.. – श्रीराम पाटील

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 27, 2024
in राजकीय
0
मतदार संघात “स्मार्ट व्हिलेज” गाव योजना राबविणार.. – श्रीराम पाटील

भुसावळ, दि.२७ – रावेर लोकसभा मतदार संघात “स्मार्ट व्हिलेज” योजना राबवून गावांना सक्षम करण्याचा व तळागाळातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी, वृद्ध महिला यांना न्याय देण्याचा प्रयत्न भावी काळात केला जाईल असे आश्वासन महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले.

रावेर लोकसभा मतदार संघातील भुसावळ तालुक्यातील गावांना शुक्रवारी प्रचार भेटी दरम्यान श्री पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. भुसावळ तालुक्यातील साकेगाव, गोजोरा. सुनसगाव, गोंभी, वेल्हाळा, मांडवे दिगर, भिल्लमळी या गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. मांडवे दिगर व भिलमळी गावातील नागरिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. गावात घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही, वृद्ध महिलांना निराधार योजनेचा लाभ मिळत नाही, आरोग्य व्यवस्था नाही, डोंगराळ भाग असल्याने शेतमाल वाहतुकीसाठी व्यवस्था नाही अशा समस्या मांडल्या. यावेळी आपण नक्की विजयी व्हाल असे आश्वासन ग्रामस्थांनी दिले.

यावेळी जळगाव जिल्हा शिवसेना उपप्रमुख मुळे बाबा, तालुका प्रमुख भुसावळ संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्र संघटक राजूभाऊ इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी दीपक मराठे, वाय.आर. पाटील ,नाना पवार, शकील पटेल, बंडू पाटील, आर सी पवार, नामदेव भोई, अमोल मांडे, विजय कोळे, चंद्रकांत निकम, अर्जुन उपासे, विनोद पवार, पिंटू पाटील, पप्पू जकात, काँग्रेसचे योगेंद्रसिंग पाटील, पंकज पाटील, अशफाक काजी, अतुल चौधरी, आयुष पाटील, धनराज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

गोजोरा येथील भेटीत गावातील ज्येष्ठ नागरिक नथू सोनवणे आत्माराम डोळे, शांताराम डोळे, जीवन जावळे, भिका डोळे, नारायण तळले, तर सुनसगाव येथे लक्ष्मण कोळी, तानाजी पाटील, सुनील सोनवणे, संजय पाटील, अनिल पाटील, वनराज तळेले, सागर चौधरी, दिगंबर पाटील, वाल्मीक दोडे, संजय पाटील, ईश्वर कोळी, प्रमोद पाटील, चेतन कोळी, योगेश पाटील, संदीप कोळी, कुंदन पाटील, लीलाधर कोळी, विजय कोळी गावातील नागरिक उपस्थित होते. मांडवे दिगर येथे कैलास जाधव शिवसेना गणप्रमुख, विशाल पवार जिल्हाध्यक्ष सेवालाल, सैनिक सुरेश वाघ, गोपी पवार, सुरेश जाधव, विक्रम पवार, ताराचंद पवार, संतोष जाधव, रमेश पवार, आप्पा पवार, मांडवे दिगर व भिलमळी गावातील ज्येष्ठ महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष व मित्रपरिवार कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.


 

Next Post
बहिणाबाई चौधरींच्या वाड्याला भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांनी दिली भेट

बहिणाबाई चौधरींच्या वाड्याला भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांनी दिली भेट

ताज्या बातम्या

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना
Uncategorized

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना

September 15, 2026
गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान
आरोग्य

गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान

September 15, 2026
कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 
गुन्हे

कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 

September 15, 2026
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

September 15, 2026
गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या
गुन्हे

गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या

September 15, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add