• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव उत्साहात संपन्न ; शोभायात्रेतून समाजोपयोगी संदेश

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 22, 2024
in सामाजिक
0
भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव उत्साहात संपन्न ; शोभायात्रेतून समाजोपयोगी संदेश

जळगाव, दि.२२ – संसारामध्ये अनंत अडचणी येत असतात, यावर मात करण्यासाठी भगवान महावीरांनी सांगितलेल्या मार्गावर चालले पाहिजे, ज्याप्रमाणे अर्जूनाने श्रीकृष्णाला आपली ताकद म्हणून उभे राहण्याची विनंती केली, त्याप्रमाणेच भगवान महावीरांचे विचार हे कृतिशील आचरणात आणा. सत्य, अहिंसा, प्रेम दया ही स्वत:ची ताकद बनवा आणि मोक्ष प्राप्ती करा, असा उपदेश परमपूज्य विजय रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज साहेब यांनी धर्मसभेत केले.

सकल जैन श्री संघ प्रणित श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमाची सुरवात ही शोभायात्रेद्वारे झाली. वासुपुज्यजी जैन मंदिराच्या प्रांगणातून ध्वजवंदन होऊन वरघोडा शोभायात्र काढण्यात आली. शोभायात्रा ही चौबे शाळा, सुभाष चौक, नवीपेठ, सरस्वती डेअरी, नेहरू चौक मार्गे सेंट्रल मॉल मध्ये समारोप झाला. मतदानाचा हक्क वाजवा, झाडे लावा, पुत्रीचा सन्मान करा, पाणी वाचवा यासह सामाजोपयोगी संदेश शोभायात्रेत लक्ष वेधून घेत होते. शहरातील विविध मुख्य चौक महावीर प्रतिमेने, जैन चिन्हांनी, संदेशांनी सजविण्यात आले होते.

संघपती दलिचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आ. सुरेश भोळे, कार्याध्यक्ष कस्तुरचंदजी बाफना, श्रीमती नयनताराजी बाफना, माजी खा. ईश्वरलाल जैन, अजय ललवाणी, प्रदीप रायसोनी, रजनीकांत कोठारी, ललित लोडिया, मनिष जैन, राजेश जैन, जितेंद्र चोरडिया, भगवान जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष पारस राका, स्वरूप लुंकड यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते.

भगवान महावीरांच्या विचारांनी शोभायात्रेदरम्यान असलेले चौकांमध्ये विशेष सजावट केली होती. शोभायात्रेत अग्रभागी नवकार मंत्र प्रचार वाहन होती. त्यानंतर चार घोडेस्वार चार ध्वजधारी, सजीव देखावे, बग्गीमध्ये भगवान महावीरांची प्रतिमा, गुरु महाराज, १०८ कलधारी महिला, बॅण्ड, जैन मंदिराचा चांदिचा रथ त्यात मूर्ती ही शोभायात्रेचे आकर्षण होते. शोभायात्रेचा समारोप खान्देश सेंट्रल मॉल येथे झाला.

मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन, पुस्तकांचे विमोचन..
शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामीजी २६२३ वा जन्म कल्याणक महोत्सवाच्या शोभायात्रेच्या समारोपाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन, दीपप्रज्वलन झाले. याप्रसंगी संघपती दलिचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आ. सुरेश भोळे, कस्तुरचंदजी बाफना, श्रीमती नयनताराजी बाफना, माजी खा. ईश्वरलाल जैन, अजय ललवाणी, प्रदीप रायसोनी, रजनीकांत कोठारी, ललित लोडिया, मनिष जैन, राजेश जैन, जितेंद्र चोरडिया, भगवान जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष पारस राका, स्वरूप लुंकड उपस्थित होते.

गौतम प्रसादीचे लाभार्थी कांताबाई इंदरचंदजी छाजेड परिवाराचा सकल श्री संघाच्या वतीने दलिचंदजी जैन यांनी मानपत्र देऊन गौरव केला. मानपत्राचे वाचन स्वरूप लुंकड यांनी केले. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.कंपनीची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे अन्नदान करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. ज्ञान प्रभाजी म.सा. यांनी संथारा घेऊन देवगमन झाल्याने त्यांचे नवकार मंत्राद्वारे स्मरण करण्यात आले व श्रद्धाभाव अर्पण केला गेला. स्वागत गीत लॉकडाऊन महिला मंडळाच्या सदस्यांनी केले. नवकार मंत्राचे स्मरण श्रद्धा महिला मंडळाने केले, जैन ध्वजगीत जैन महिला मंडळातर्फे सादर करण्यात आले. सूत्रसंचालन नितीन चोपडा यांनी केले. श्रेयस कुमट यांनी आभार मानले.

‘अर्जी तेरी मर्जी तेरी’ या पुस्तकाचे विमोचन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि कस्तुरचंदजी बाफना यांच्याहस्ते झाले. जैन युवा फाउंडेशनतर्फे सकल जैन समाजाची डायरीच्या ऐप app चे अनावरण करण्यात आले. जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांच्या मार्गदर्शनातून साकार झालेल्या ‘जे टू जे’ डायरीचे जीतो युथ विंग तर्फे प्रकाशन केले गेले.

भव्य रक्तदान शिबीर..
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवा निमित्त जय आनंद ग्रुपतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. आरोग्य तपासणीसह देहदान, नेत्रदानाचे अर्जही भरुन घेतले जात होते. रक्तदान शिबीरात संध्याकाळ पर्यंत २७१ रक्त पिशव्यांचे संकलन झाले. इंडीयन रेडक्रॉस सोसायटी आणि माधवराव गोळवलकर रक्तपेढी यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी जय आनंद ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


 

Next Post
हुकूमशाही सरकारला जनताच आता घरी पाठवणार जामनेर मेळाव्यात शरद पवार यांचे टीकास्त्र

हुकूमशाही सरकारला जनताच आता घरी पाठवणार जामनेर मेळाव्यात शरद पवार यांचे टीकास्त्र

ताज्या बातम्या

पाचोऱ्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा ‘आक्रोश’
कृषी

पाचोऱ्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा ‘आक्रोश’

November 13, 2025
स्व.डॉ.उल्हास कडूसकर यांच्या स्मरणार्थ वैद्यक सेवेसाठी प्रेरणादायी कार्य
आरोग्य

स्व.डॉ.उल्हास कडूसकर यांच्या स्मरणार्थ वैद्यक सेवेसाठी प्रेरणादायी कार्य

November 13, 2025
रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापणारे दोन सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात!
खान्देश

रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापणारे दोन सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात!

November 13, 2025
जळगाव सी.ए. शाखेस मुंबई डब्ल्यू.आय.आर.सी. टीमची भेट: ‘अकाउन्टींग म्युझियम’चे लोकार्पण
खान्देश

जळगाव सी.ए. शाखेस मुंबई डब्ल्यू.आय.आर.सी. टीमची भेट: ‘अकाउन्टींग म्युझियम’चे लोकार्पण

November 13, 2025
जळगाव गोळीबार प्रकरण: मुख्य संशयीतासह साथीदाराला अटक
खान्देश

जळगाव गोळीबार प्रकरण: मुख्य संशयीतासह साथीदाराला अटक

November 13, 2025
भुसावळमध्ये महानगरी एक्स्प्रेसचा थरार! ‘बॉम्ब’च्या धमकीने मध्य रेल्वे मार्गावर ‘हाय अलर्ट’
खान्देश

भुसावळमध्ये महानगरी एक्स्प्रेसचा थरार! ‘बॉम्ब’च्या धमकीने मध्य रेल्वे मार्गावर ‘हाय अलर्ट’

November 12, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group