रावेर, दि.१६ – रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांची नियोजन बैठक मंगळवारी संपन्न झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजकारणात नवी कोरी पाटी असलेले व तरुणांच्या हातांना काम देणारे आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान प्रत्येक गावातून तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आघाडीच्या उमेदवाराला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे देखील सांगण्यात आले. तसेच यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील,आ. शिरीष चौधरी,माजी आ. अरुण पाटील, महीला प्रदेशाध्यक्षा रोहीणी खडसे, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, अतुल पाटील, शिवसेना(उबाठा)चे प्रल्हाद महाजन, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मुरलीधर तायडे, किसान सभेचे सोपान पाटील, बाजार समिती संचालक मंदार पाटील, रविंद्र पवार, किशोर पाटील, योगिराज पाटील, राजेश घोरपडे, कॉग्रेस तालुकाध्यक्ष तथा बाजार सिमिती संचालक राजेंद्र पाटील, धनंजय चौधरी, मेहमुद शेख आदी उपस्थितीत होते.