• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लीनेस क्लब जळगावचा सामाजिक उपक्रम: आवार येथील ‘वाचन कट्ट्या’ला शालेय साहित्याची मदत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 18, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
लीनेस क्लब जळगावचा सामाजिक उपक्रम: आवार येथील ‘वाचन कट्ट्या’ला शालेय साहित्याची मदत

​जळगाव, (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा, या उदात्त हेतूने लीनेस क्लब जळगाव तर्फे आवार (ता. जळगाव) येथील ‘माय माती फाउंडेशन’ संचलित वाचन कट्ट्याला शालेय साहित्य प्रदान करण्यात आले.

​प्रभावती पाटील यांच्या कार्याचे कौतुक..
​याप्रसंगी वाचन कट्ट्याच्या संचालिका प्रभावती पाटील यांच्या कार्याची पाहणी क्लबच्या सदस्यांनी केली. प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण मुलांसाठी त्या राबवत असलेला हा उपक्रम पाहून उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले. या उपक्रमासाठी अनुजा गुंजन बोथरा यांचे मोलाचे आर्थिक सहकार्य लाभले.

​या कार्यक्रमाला लीनेस क्लबच्या अध्यक्षा रेखा वर्मा, सचिव नीला चौधरी, माजी अध्यक्षा रेश्मा बेहराणी, अनिता कांकरिया, अलका कांकरिया तसेच आवार गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान ​क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी वाचन कट्ट्यावरील मुलांशी संवाद साधून त्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला. संचालिका प्रभावती पाटील यांनी वाचन कट्ट्याचे कामकाज, मुलांचा सहभाग आणि भविष्यातील गरजांबाबत सविस्तर माहिती दिली.

​यावेळी बोलताना अनिता कांकरिया व अध्यक्षा रेखा वर्मा यांनी आश्वासन दिले की, “पुढील काळातही या वाचन कट्ट्याला किंवा मुलांना कोणत्याही शैक्षणिक साहित्याची आवश्यकता भासल्यास, लीनेस क्लबतर्फे ती पूर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्न केले जातील.”
​

Next Post
टोके शाळेत लिनेस क्लबतर्फे मोफत दंत चिकित्सा शिबिर संपन्न

टोके शाळेत लिनेस क्लबतर्फे मोफत दंत चिकित्सा शिबिर संपन्न

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add