जळगाव, दि.१५ – ‘‘ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला, कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला.. बाबासाहेबांनी दलित वर्गाला समाजात समानता मिळवून देण्याबरोबरच त्यांनी समाजसुधारणेसाठीही अनेक कामे केली. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. पण, ते अवघ्या जगासाठी एक मूर्तिमंत उदाहरण बनले आहेत, ज्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती दरवर्षी १४ एप्रिल रोजी देशभरात साजरी केली जाते. यंदा संपूर्ण देश त्यांची १३३ वी जयंती साजरी करत आहे.
संविधान सभेसाठी निवड झाल्यावर मूलभूत अधिकार, संघराज्य रचना आणि अल्पसंख्याक आणि वंचितांसाठी संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी विशेषत: धार्मिक स्वातंत्र्य, अस्पृश्यता निर्मूलन आणि शोषणापासून संरक्षण यांसारख्या अधिकारांवर भर दिला. एक मजबूत केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये अधिकारांचे विभाजन सुनिश्चित करण्यासाठी बाबासाहेबांनी संघराज्य पद्धतीचे समर्थन केले. अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षणासाठी देखील त्यांनी कार्य केले. भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची व्यक्ती, आंबेडकर हे एक न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक देखील होते. ज्यांनी दलित यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी, महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. अशा या महामानवाला १३४ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन आज भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय एम फाउंडेशन येथे पुष्पहार घालून करण्यात आले.
यावेळी लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, डॉ. राधेशाम चौधरी, माजी महापौर सीमा भोळे, अरविंद देशमुख, विशाल त्रिपाठी, महेश जोशी, सुनील खडके, राजेंद्र मराठे, उदय भालेराव, मुकुंद मेटकर, महेश पाटील, डाॅ. केतकी पाटील, नीला चौधरी, दीपमाला काळे, सुचिता हाडा, गायत्री राणे, नंदिनी दर्जी, ज्योती निंभोरे, चित्रा मालपाणी, राजू मराठे, राहुल पाटील, मुविकोराज कोल्हे तसेच मंडल अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.