जळगाव, दि. ०३ – येथील ला.ना.सार्वजनिक विद्यालयातील पर्यवेक्षिका भारती बेंद्रे – गोडबोले यांचा ३४ वर्षांच्या सेवापुर्ती निमित्त शाळेतील १९९४ च्या दहावीतील विद्यार्थ्यांनी सौ. गोडबोले यांचा सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरव केला. शहरातील रॉयल पॅलेसच्या सभागृहात आयोजित सोहळ्यात व्यासपीठावर गोडबोले मॅडम व त्यांचे पती मकरंद गोडबोले यांची उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांमधून सतीश सैंदाणे, कुमुदिनी असोदेकर व इतरांनी तसेच पालकांमधून विद्या धर्माधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात गोडबोले मॅडम यांच्या १९९० पासून शिक्षिका ते पर्यवेक्षिका असा प्रवास सांगत, नोकरीच्या पहिल्याच वर्षी त्या याच बॅचच्या विद्यार्थ्यांच्या वर्गशिक्षिका होत्या. या दुग्धशर्करा योगामुळे सर्व विद्यार्थ्यांनी अनेक आठवणींना उजाळा करून दिला.
सौ. भारती गोडबोले यांनी सत्काराबद्दल विद्यार्थ्यांना आशीर्वादपर भावना व्यक्त करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यांच्या शैक्षणिक कार्याचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन सत्यजित नेमाने यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. राहुल येवले यांनी तर आभार वैभव धर्माधिकारी यांनी मांनले.
यशस्वीतेसाठी दीपक नेहेते, रोशन पगारिया, संदीप जैन, उज्वल देवरे, महेंद्र चौधरी, यांच्यासह ४० विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सर्व माजी विद्यार्थ्यांची परिवारासह उपस्थिती होती.