सुनिल आराक | भुसावल, दि.09 – गणेश चतुर्थीला गणरायाच्या आगमना निमित्त सर्वत्र गणेश भक्तांनी खरेदीसाठी बाजारपेठेत एकच गर्दी केली. दरम्यान यंदा कोरोनाने काहीसा दिलासा दिला असल्याने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी गणरायाच्या विविध मूर्ती व सजावटीचे साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. दरम्यान गणेश भक्तांनी गुरूवारी खरेदी करण्याकरिता बाजारात गर्दी केली.
शासनाच्या नियमानुसार चार फुटांपर्यंतच्या गणेश मुर्त्या विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. यात दगडूशेठ गणपती, लालबागचा राजा, फेटेवाला गणपती यानां जास्त प्रमाणात मागणी असल्याचे भुसावळ येथील विक्रेत्यांनी सांगितले. कोरोनाच्या काळामुळे मंदी असल्याने सजावटीसाठी लागणाऱ्या मालाची पाहिजे त्या प्रमाणात विक्रि होत नसल्याची खंत विक्रेता रवींद्र अट्रावलकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान बाजारपेठेत खरेदी करताना शासकीय नियमांचे पालन न करता गर्दी करणे, मास्क न लावत फिरताना नागरिक दिसून आले. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव काहीसा ओसरला जरी असला, तरी यंदा मात्र गणेश भक्तांना कोरोनाचा विसर नक्कीच पडला असं म्हणायला हरकत नाही..
पहा.. VIDEO