• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बहिणाबाई महोत्सवात बचत गटांची १ कोटी ६० लाखांची उलाढाल

शिवराज्याभिषेक पोवाड्याने कार्यक्रमाचा समारोप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 30, 2024
in जळगाव जिल्हा
0
बहिणाबाई महोत्सवात बचत गटांची १ कोटी ६० लाखांची उलाढाल

जळगाव, दि.२९ – भरारी फाउंडेशनतर्फे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवाचा सोमवारी सायंकाळी समारोप झाला. महोत्सवाचे हे नववे वर्ष होते. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीं, संस्थांना बहिणाबाई विशेष सन्मानाने सन्मानीत करण्यात आले.

यात संजीव बावस्कर, संतोष चौधरी, प्रा. ईश्वरप्रसाद रितापूरे, पोलीस स्पोर्ट्स अकॅडमी जळगांव, द फ्रेंड्स ऑफ एनिमल, हर्षल पवार, युवा शाहीर सुरज राऊळ, डॉ. नरेंद्र चौधरी, एकता चौधरी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यादरम्यान विविध बचत गटांची त्यांच्या मालाच्या विक्रीतून १ कोटी ६० लाखांची उलाढाल झाल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सांगितले.

महोत्सवात बचत गटांनी विक्रीस ठेवलेले खाद्य पदार्थ, दैनंदिन गृहोपयोगी वस्तू यांना ग्राहकाची विक्रमी दाद या आर्थिक उलाढालीतून यंदा मिळाली. याठिकाणी सुक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने उद्योगांना चालना देण्यासाठी विविध उत्पादनांचे स्टॉल तसेच खान्देश पर्यटनाचे दालन विशेष आकर्षण ठरले.

समारोपप्रसंगी शाहीर रामानंद उगले व सहकारी यांनी शिवराज्याभिषेक पोवाडा सादर करत उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. या कार्यक्रमाने बहिणाबाई महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी खा. उन्मेष पाटील, आ. सुरेश भोळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, जिल्हा दूध उत्पादक संघाचे व्यवस्थापकीय संचालक, प्रा.वासुदेव पाटील आदी उपस्थित होते.

महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विनोद ढगे, सचिन महाजन, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, विक्रांत चौधरी, हेमंत पाटील, सागर पगारीया, दुर्गेश आंबेकर, मंगेश पाटील अभिषेक बोरसे, आकाश भावसार, हितेश चौधरी, स्वप्नील वाघ यांनी परिश्रम घेतले सुत्रसंचलन विनोद ढगे यांनी केले.

Next Post
कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत जळगावचे ‘हम दो नो’ प्रथम

कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत जळगावचे 'हम दो नो' प्रथम

ताज्या बातम्या

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव
जळगाव जिल्हा

बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add