जळगाव, दि.२९ – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. (आरसीएफ) यांच्याद्वारे प्रधानमंत्री जन उर्वरक परियोजना अंतर्गत युरिया गोल्ड ( सल्फर कोटेड यूरिया) चे भारतातील पहिल्या रॅकचे जळगाव शहरात जल्लोषपूर्ण स्वागत झाले.
यावेळी कृषी विकास अधिकारी सूरज जगताप, मोहीम अधिकारी विजय पवार, एमआयडीसीचे विभागिय व्यवस्थापक श्री इंगळे, आरसीएफ जळगाव जिल्हा प्रभारी जाकीर शेख, अधिकृत विक्रेते, उप-विक्रेते, प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. सदर कार्क्रमाचे उदघाटन कृषी विकास अधिकारी यांच्या हस्ते झाले.
युरिया गोल्ड मध्ये १७% सल्फर व ३७ % नायट्रोजेन आहे. ज्यामुळे मातीतील सल्फरची कमतरता भरून काढली जाते. याची विशेषता म्हणजे कमी मात्रात जास्त परिणाम, मातीतील पोषक तत्वांची सुधारणा, उत्पादकता आणि गुणवत्तेत वाढ, शेतकरी बंधूंना जास्त आर्थिक लाभ, नायट्रोजन सोबत सल्फर प्रकार उपलब्ध (नायट्रोजन ३७% आणि सल्फर १७%) आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्शवभूमीवर जळगाव आणि परिसरातील शेतकरी बांधवांकरिता हि एक सुवर्ण संधी असल्याचे सांगण्यात आले.
युरिया गोल्डचा लाभ घेण्याचे आवाहन आरसीएफ जळगाव चे प्रमुख जाकीर शेख यांनी केले आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आता युरिया गोल्डची मुबलक उपलब्धता आणि लाभ घेता येईल.