जळगाव, दि.२५ – भरारी फाउंडेशनतर्फे २५ ते २९ जानेवारी दरम्यान सागर पार्क मैदानावर बहिणाबाई महोत्सव होणार आहे. यंदा महोत्सवाचे ९ वे वर्ष असून २५ जानेवारीस सायंकाळी पाचला ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सागर पार्क मैदानावर उद्घाटन होईल.
यावेळी खा. उन्मेष पाटील,आ. सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, नाबार्डचे चे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे,भालचंद्र पाटील, श्रीराम पाटील,अनील काकंरीया, डॉ . पी. आर. चौधरी, बाळासाहेब सुर्यवंशी आदींनी उपस्थिती राहणार आहे. यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण म्हणजे खानदेशातील पर्यटन स्थळांच्या माहितीचे दालन, शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, राममंदिर प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
असे आहेत कार्यक्रम
२५ जानेवारीला महिलांसाठी ‘ जागर सखींचा, तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर २६ जानेवारीला एक ‘शाम देश के नाम ‘ देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम , २७ जानेवारीला गीतरामायणातील गाण्यांवर डॉ. अपर्णा भट व सहकाऱ्यांचा ‘अवधेय’ हा नृत्याविष्कार व मराठी संस्कृतीचा फॅशन शो, २८ जानेवारीला प्रसिद्ध ऋषिकेश रिकामे यांचा ‘भाव युवा मनाचे ‘ हा भावगीतांचा कार्यक्रम त्याचप्रमाणे ‘आयतं पोयतं सख्यानं ‘ हे एकपात्री नाटक तसेच २९ जानेवारी रोजी शाहीर रामानंद उगले यांच्या शिवराज्याभिषेक पोवाडा असे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. तसेच विविध खाद्यपदार्थांची मेजवानी याठिकाणी आहे.