मुंबई, दि. ०९ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ईशान्य मुंबई, भिवंडी, दिंडोरी, माढा, कोल्हापूर, अहमदनगर, सातारा, बीड, हिंगोली आणि जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड, खा. श्रीनिवास पाटील, आ. एकनाथ खडसे, माजी मंत्री आ. राजेश टोपे, आ. बाळासाहेब पाटील, माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे, आ. शशिकांत शिंदे, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, मुंबई प्रदेश अध्यक्षा राखी जाधव, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. रोहिणीताई खडसे, पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे व डिजिटल मीडिया रिसर्च अँड कम्युनिकेशन विभागाचे राज्यप्रमुख नीरज महांकाळ यांसह इतर जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.