जळगाव, दि.२८- शहरातील प्रभाग क्रमांक १७ व प्रभाग क्रमांक ३ मध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले. प्रभाग क्रमांक १७ मध्ये अयोध्या प्रोव्हिजन ते ट्रान्सपोर्ट नगर या रस्त्याच्या कामाचे आणि प्रभाग क्रमांक ३ मधील कमल लॉन च्या मागील मनपा जागेच्या सुशोभीकरण कामाचा देखील भूमिपूजन यावेळी करण्यात आले. दरम्यान आमदार सुरेश भोळे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून रहिवाशांची संवाद साधला.
या प्रसंगी नगरसेवक डॉ. विरण खडके, भरत सपकाळे, बंटी भारंबे, गणेश कोळी, संजय पाटील, संतोष इंगळे, प्रदीप रोटे, किसन मराठे आदी मान्यवरांसह परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.