जळगाव, दि.०१ – साधारण एक वर्षापुर्वी जळगाव महानगरपालीकेने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने अंतर्गत शहरात १७ ठिकाणी दवाखाने सुरू करण्याबाबत महासभेत ठराव केला आहे. त्यामधील एकमेव दवाखाना शिव कॉलनीत सुरू झाला असुन उर्वरीत १६ दवाखाने तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
शहरातील नागरीक आरोग्याच्या लाभाशी संबंधित हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना अतिशय उत्तम असुन त्यामुळे गोरगरीब रुग्णांना लाभ होणार आहे. मात्र महानगरपालिका प्रशासनाचे या संदर्भात दुर्लक्ष होत असल्यामुळे चांगल्या योजनेचा खोळंबा होत असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
कर्मचारी वर्गाची भरती..
दवाखान्याकरीता एक वर्षापुर्वी २४ आरोग्य सेवकांची परीक्षेद्वारा निवड करण्यात आली असुन आठ परीचारीकेची देखील निवड केली आहे. त्यामुळे हे सर्व कामाची प्रतिक्षा करीत आहेत. शासनाने प्रत्येक दवाखान्याकरीता निधी उपलब्ध करून दिला असुन दवाखाने सुरू न झाल्यास ३१ मार्च २०२४ नंतर सदर निधी परत जावु शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी ॲड. जयप्रकाश बाविस्कर (मनसे नेते), जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगर अध्यक्ष आशिष सपकाळे, ललित शर्मा, सतीश सैंदाणे, चेतन पवार, मनविसे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, श्रीकृष्ण मेंगडे, संतोष पाटील, प्रकाश जोशी, विकास पाथरे, प्रकाश बाविस्कर, राजू डोंगरे, यश कुमावत उपस्थित होते.