जळगाव, दि. ०१ – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या प्रित्यर्थ सोमवार, दि. ४ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०२३ दरम्यान मेहरूण मध्ये अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन माजी नगरसेवक प्रशांत नाईक व अर्चना प्रशांत नाईक यांच्या वतीने करण्यात आले आहे. श्रीमद् भागवत ग्रंथ पुजन कार्यक्रम दि. ४ रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथ पुजनाने होईल, ग्रंथ पुजन माजी महापौर तथा जेष्ठ नगरसेवक नितीनभाऊ लढ्ढा व अलकाताई लढ्ढा यांच्या हस्ते होईल. सदर कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर महाराज चौक कै. सुरेश (मामा) नाईक यांच्या घराजवळ, मेहरूण, जळगाव येथे आयोजित केला आहे.
सप्ताहाचे हे २३ वे वर्ष असून अधोगतीच्या मार्गाने भरकटत जावून दुःखाच्या खाईत तळमळणाऱ्या जीवाला सुख, समाधान, शांतीरूपी जीवन जगण्यासाठी एकमेव साधन परमार्थ, किर्तन, प्रवचन श्रवणाने माणसाचा आध्यात्मिक विकास होवून मानवी मनाचे दुर्बल नष्ट व्हावे तथा धार्मिक चैतन्य निर्माण होवून सर्वांचे कल्याण व्हावे हाच पवित्र मानस मनात ठेवून सप्ताहाचे आयोजन केले असल्याचे आयोजक तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सांगत काकडआरती, किर्तन, प्रवचन, हरीपाठ याचा आस्वाद घेवून सप्ताहाची सार्थकता करावी, असे आवाहन केले आहे.
दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे..
काकडआरती सकाळी ५ ते ६, हरीपाठ सायंकाळी ५ ते ६, हरीकिर्तन रात्री ८ ते १० दैनिक हरिनाम किर्तन सहभाग गायनाचार्य ह.भ.प. राजु महाराज, कापुसवाडीकर, ह.भ.प. रमेश महाराज, मृदुंगांचार्य ह.भ.प. सदानंद, विणेकरी रमेश विठ्ठल चाटे, मेहरुण महाराज गंगावणे, पेटी वादक ह.भ.प. विठ्ठल महाराज, अंभई टाळकरी श्रीराम मंदीर भजनी मंडळ, श्री विठ्ठल मंदीर भजनी मंडळ, मेहरूण असे राहणार आहे.
सप्ताहाची सांगता समारोप..
अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाची सांगता दि. ११ डिसेंबर ला सकाळी ०९ वाजता होणार असून याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, माजी शिक्षण मंत्री सुरेशदादा जैन, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, जैन इरिगेशन सिस्टीम चे चेअरमन अशोकभाऊ जैन, आमदार सुरेश भोळे (राजू मामा), जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, महानगरपालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहल पवार (कुडचे), एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, तहसीलदार नामदेवराव पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीमद् भागवत कथेचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम ११ ते ०३, दिंडी सोहळा दुपारी ०४ ते ०६, भारुडाचा कार्यक्रम संध्याकाळी ०६ ते ०७, काल्याचे किर्तन रात्री ०८ ते १०:३० पर्यंत आहे.
कार्यक्रमासाठी यांचे लाभतय सहकार्य..
संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, श्रीराम तरूण मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, जय जवान मित्र मंडळ, साई दत्त गृप महाजन नगर, वंजारी युवा संघटना, एक गाव एक गणपती मित्र मंडळ, मेहरूण, श्री स्वामी विवेकानंद मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी चौक मित्र मंडळ, सुभाषचंद्र नेताजी चौक, श्री संत ज्ञानेश्वर प्राथ. विद्यालय शिक्षक व कर्मचारी वृंद तसेच मेहरूण परिसरातील समस्थ ग्रामस्थ मंडळी, जळगाव.