जळगाव, दि.११ – भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने शहरातील गरीब व वंचित लोकांसोबत शनिवारी दिवाळी साजरी करण्यात आली. दरम्यान जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्याहस्ते गरीब व गरजूंना दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आला. तसेच लहान मुलांना खाऊ देण्यात आला.
हा कार्यक्रम शहरातील तंट्याभिल वस्ती, तसेच मेहरूण येथील भिल्ल वस्ती, दलित वस्ती याठिकाणी फराळ वाटप करून संपन्न झाला. यावेळी उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. सर्वांनी आयोजकांचे आभार मानले.
याप्रसंगी महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, ज्योती निंभोरे, राजेंद्र घुगे पाटील, सरोज पाठक, महेश चौधरी, नीतू परदेशी, सागर पाटील, माजी नगरसेवक डॉ. वीरन खडके, कुमार सिरामे, शक्ति महाजन, विनोद मराठे, प्रमोद वाणी, प्रल्हाद सोनवणे, गजानन वंजारी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.