जळगाव, दि. १० – परिवर्तनतर्फे जळगावात नरक चतुर्दशीच्या दिवशी तालासुरांनी व स्वरांनी दिवाळीचे स्वागत ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. रविवारी १२ नोव्हेंबर रोजी पहाटे ६ वाजता भाऊंचे उद्यानात ही मैफल होणार आहे.
प्रेम, आनंद आणि उल्हासाच्या संगीतमय मैफिलीत स्वरांचा प्रेमळ सहवास रसिकांना अनुभवता येणार आहे. या सांगीतिक मैफलीत गायिका ऐश्वर्या परदेशी, स्वानंद देशमुख व गायक व संवादिनीवादक गोविंद मोकाशी गायन करणार आहेत. साथसंगत करणाऱ्या कलावंतामध्ये तबल्यावर भूषण गुरव, कीबोर्ड गौरव काळंगे, हँडसोनिकवर रोहित बोरसे तर अनुज पाटील हे पखवाजची साथसंगत करणार आहेत.
दिवाळी पहाट कार्यक्रमाची संकल्पना भूषण गुरव यांची असून कार्यक्रमाचे दिग्दर्शन मंजुषा भिडे यांनी केले आहे. निर्मिती नारायण बाविस्कर, विनोद पाटील यांची असून होरीलसिंग राजपूत व मंगेश कुळकर्णी हे कार्यक्रमाचे सुत्रधार आहेत. भाऊंचे उद्यानात ही मैफल होणार असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.