• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विवेकी विचारांची ज्योत महाराष्ट्र अंनिसने तेवत ठेवली.. – जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर

मअंनिसची जिल्हा बैठक उत्साहात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 10, 2023
in जळगाव जिल्हा
0
विवेकी विचारांची ज्योत महाराष्ट्र अंनिसने तेवत ठेवली.. – जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर

जळगाव, दि.१० – केवळ ज्ञान आणि माहिती मिळाली म्हणून संघटना कृतिशील होत नाही. त्यासाठी विचारांनी प्रेरित होऊन, स्वयंप्रेरणेने कृतीशील असणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी आवश्यक असते. आज समितीकडे तरुणांची टीम असल्याने संघटना मजबूतपणे उभी आहे. विवेकी विचारांची ज्योत तेवत ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र अंनिसने यशस्वीपणे पार पाडली आहे व पुढेही सुरू राहणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जळगाव जिल्ह्याची बैठक भुसावळ येथे प. क. कोटेचा महिला महाविद्यालयात घेण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर होते. प्रसंगी वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभागाचे राज्य कार्यवाह प्रा. डी. एस. कट्यारे, जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र चौधरी उपस्थित होते. सुरुवातीला प्रस्तावनेतून रविंद्र चौधरी यांनी समितीच्या कामकाजाविषयी माहिती दिली. त्यानंतर वर्धा येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीचे इतिवृत्त वाचून आगामी उपक्रमाविषयी सांगितले.

प्रा. कट्यारे यांनी वैज्ञानिक जाणीव प्रकल्प आणि विविध उपक्रम राबविण्याबाबत माहिती दिली. यावेळी, राजेंद्र बाविस्कर यांनी, सर्वसामान्यांच्या अंधश्रद्धा सुटायला हव्यात असे सांगून आपण विज्ञान शिकतो पण जीवनात त्यांचा दृष्टिकोन घेत नाही याबाबत खेद व्यक्त करीत समाजसुधारकांचा जयकार खूप होतो पण त्यांचे विचार मात्र कोणी वाचताना व आचरताना दिसत नाही असे सांगितले. जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांनी, पुढील जानेवारी महिन्यात जळगाव येथे घेण्यात येणाऱ्या राज्य कार्यकारिणी बैठकीविषयी प्राथमिक नियोजन सांगितले. त्यावर कार्यकर्त्यांनी चर्चा केली.

सूत्रसंचालन प्रा. निलेश गुरचळ यांनी केले तर आभार राजेश तायडे यांनी मानले. बैठकीला जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Next Post
जळगावच्या व्यापारी संकुलातील गाळे धारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा मार्ग मोकळा

जळगावच्या व्यापारी संकुलातील गाळे धारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा मार्ग मोकळा

ताज्या बातम्या

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा
जळगाव जिल्हा

‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add