• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

युवारंग हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा मंच – पालकमंत्री गुलाबराव पाटील

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 8, 2023
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
युवारंग हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा मंच – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव. दि.०८ – ‘युवारंगसारख्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून यातून भावी काळात विद्यार्थ्यांना करिअरसाठी नक्कीच लाभ होणार आहे” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि के.सी.ई. संस्थेचे मुळजी जेठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते. यावेळी अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष अशोक जैन, संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, आ. सुरेश भोळे, प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, महोत्सवाचे कार्याध्‌यक्ष राजेंद्र नन्नवरे, सहसंचालक प्रा.संतोष चव्हाण, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शिवाजी पाटील, प्रा. साहेबराव भूकन, प्राचार्य संजय सुराणा, प्रा.सुरेखा पालवे, प्रा. महेंद्र रघुवंशी, डॉ.पवित्रा पाटील, ॲङ अमोल पाटील, नितीन झाल्टे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, संस्थेचे कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्राचार्य एस.एन. भारंबे, राज्य सुकाणू समिती सदस्य अनिल राव, भरत अमळकर, प्र. अधिष्ठाता प्राचार्य एस.एस.राजपूत, प्राचार्य ए.पी. खैरनार, प्राचार्य अशोक राणे, ॲङ प्रमोद पाटील, भालचंद्र पाटील, डॉ. हर्षवर्धन जावळे, ॲङ प्रवीणचंद्र जंगले, रुपेश चिरमाडे, संजय प्रभूदेसाई, सी.ए. रवींद्र पाटील, प्रा.योगेश पाटील, डॉ.जुगलकिशोर दुबे, डॉ.मनोज महाजन यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, महाविद्यालयात शिकत असतांना मी अभ्यासात पक्का नव्हतो पण कलेमध्ये पुढे होतो. त्या कलेचा फायदा मला राजकारणात झाला आणि राजकारणात चांगली संधी मिळत गेली. तुमच्या शिक्षणासोबतच तुमची मांडणी कशी आहे. हे महत्वाचे असून त्यामुळे कला सादर करतांना उत्तम करा. यातूनच उद्याचे कलावंत घडणार आहेत. जे राज्यात आपला स्वतंत्र ठसा उमटवतील. या महोत्सवात मुलींचा सहभाग वाढल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी विद्यापीठ हे सातत्याने विविध उपक्रमांसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून कोविड नंतर यंदा प्रथमच पहिल्या सत्रात युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जेणेकरुन यातील विद्यार्थ्यांना इंद्रधनुष्य स्पर्धेत सहभाग घेता येईल. या महोत्सवात शिस्त पाळा. शिस्तीचे महत्व लक्षात आल्यास जीवनातील प्रत्येक टप्प्यावर शिस्त महत्वाची आहे हे तुम्हाला लक्षात येईल. सर्वांचे कला प्रकार बघा असे आवाहन केले.

विकासचंद्र रस्तोगी यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी हट्ट धरावा असे आवाहन करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना सर्वव्यापी व परिपूर्ण शिक्षण मिळेल असे मत व्यक्त केले. असे महोत्सव म्हणजे वर्ग खोलीच्या बाहेर शिकण्याची व व्यक्तिमत्त्व घडविण्याची संधी असल्याचे ते म्हणाले. अशोक जैन यांनी करिअर घडविण्यासाठी कला हा देखील मार्ग आहे. या क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करून वाटचाल करा अडचण आल्यास सहकार्य करण्याची ग्वाही अशोक जैन यांनी दिली.

विद्यार्थी विकास विभागाचे संचालक व महोत्सवाचे संयोजक प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांनी विद्यापीठाची भूमिका विशद करतांना सांगितले की, ४५० विद्यार्थी आणि ८२५ विद्यार्थिनी या महोत्सवात सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ कटीबध्द आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोककला महोत्सव, विद्यार्थी साहित्य संमेलन व दिव्यांग कला महोत्सवाचे आयोजन विद्यापीठाकडून करण्यात येणार आहे अशी माहिती दिली.

Next Post
कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक.. -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक.. -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन पुस्तिकेचे प्रकाशन
जळगाव जिल्हा

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन पुस्तिकेचे प्रकाशन

November 29, 2023
२६/११ मधील वीर शहीदांना जळगावात आदरांजली
जळगाव जिल्हा

२६/११ मधील वीर शहीदांना जळगावात आदरांजली

November 26, 2023
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ रथाचा खा. उन्मेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
जळगाव जिल्हा

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ रथाचा खा. उन्मेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

November 26, 2023
बंदोबस्तात व्यस्त असलेला पोलीस मैदानावर मजबूत.. – पालकमंत्री गुलाबराव पाटील
क्रिडा

बंदोबस्तात व्यस्त असलेला पोलीस मैदानावर मजबूत.. – पालकमंत्री गुलाबराव पाटील

November 26, 2023
सामाजिक सेवेसाठी प्रशांत नाईक यांचा सन्मान
जळगाव जिल्हा

सामाजिक सेवेसाठी प्रशांत नाईक यांचा सन्मान

November 23, 2023
केरळी महीला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदीरात कार्तिक पौर्णिमा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
जळगाव जिल्हा

केरळी महीला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदीरात कार्तिक पौर्णिमा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

November 21, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.