• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वाकोदला कृषीचे पदवी महाविद्यालय सुरू करण्याचा शरद पवार यांचा अशोक जैन यांना सल्ला

गौराई कृषी तंत्रनिकेतन विद्यालयाला पवारांची भेट

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 16, 2023
in जळगाव जिल्हा
0
वाकोदला कृषीचे पदवी महाविद्यालय सुरू करण्याचा शरद पवार यांचा अशोक जैन यांना सल्ला

जळगाव दि. १६ – जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांची जन्मभूमी असलेल्या वाकोद येथील गौराई कृषी तंत्र निकेतन व कृषीतंत्र विद्यालयाला आज माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी भेट देऊन संस्थेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी शरद पवार यांचे स्वागत करून संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी शरद पवार यांच्यासमवेत माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र चौधरी, आशिष भिरूड, अजय काळे, जैन इरिगेशन सिस्टीम चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॕ.अनिल ढाके, जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत यांनी कृषीशिक्षणास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद असल्याचे सांगून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची या तंत्रनिकेतनामुळे मोठी सोय झाल्याचे निदर्शनास आणुन दिले.

कविवर्य ना. धों. महानोर यांचे गाव असलेल्या पळसखेडा पासून वाकोदचे अंतर चार किमीचे असुन भवरलाल जैन आणि कवि ना. धों. महानोर यांची मैत्री वाकोद गावातूनच लहानपणापासून वाढीला लागली. त्यांच्या आठवणीही हे तंत्रनिकेतन पाहताना जागृत झाल्या. या आठवणींना शरद पवार साहेबांनी यावेळी उजाळा दिला. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी वाकोदचा वटवृक्ष, वाघूरचे पाणी, मरुभुमीतुन बाहेर पडताना ही भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंची पुस्तके भेट दिली.

वाकोदच्या या परिसरात कृषीचे पदवी महाविद्यालय (ॲग्रिकल्चर बिएस्सी) सुरू करावे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्यासपिठ उपलब्ध करून द्यावे, असा सल्ला शरद पवार यांनी यावेळी अशोक जैन यांना केला. भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे गेल्या १३ वर्षांपासुन हे कृषी तंत्रनिकेतन चालविण्यात येत आहे. वाकोदच्या १०८ एकर परिसरात प्रात्यक्षिसह हे तंत्रनिकेतन विस्ताराले आहे. सातत्याने कायम अ श्रेणीत, कृषि क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचे कॕम्पस, उच्चविद्याविभुषित प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, सर्व सुविधायुक्त वसतीगृह, सुसज्ज ग्रंथालय व वाचनालय, बीएस्सी ॲग्रीची डीग्री पुर्ण करत असताना कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम देखील एकाच प्रक्षेत्रावर असलेली राज्यातील एकमेव संस्था आहे.

Next Post
माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी घेतली ना. धों. महानोर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी घेतली ना. धों. महानोर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add