• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद, आमदारांनी केले उपक्रमाचे कौतुक

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व आत्माचा उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 14, 2023
in कृषी, जळगाव जिल्हा
0
रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद, आमदारांनी केले उपक्रमाचे कौतुक

जळगांव, दि.१४ – प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरातील रोटरी हॉल येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.संभाजी ठाकूर, आत्माचे प्रकल्प संचालक पांडुरंग साळवे, रोटरीचे सरिता खाचणे, मुनीरा तरवारी, योगेश भोळे आदी उपस्थित होते.

केळीवरील कुंकंबर मोझॅक, करपा आदी रोगांवर करायचा उपाययोजना व व्यवस्थापन याबाबत जाणीव जागृती करणाऱ्या पोस्टरचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. यावेळी‌ जिल्हाधिकाऱ्यांनी रानभाजी अंबाडी पासून बनवलेले पराठे, फांगची भजी, मशरूमचा वडा आदी अस्सल गावरान पदार्थांचा आस्वाद घेतला. महिला बचतगटांच्या सदस्यांशी त्यांनी संवाद ही साधला.

ह्या रानभाज्या ठरल्या आकर्षण –
मायादेवी नगर‌ येथील रोटरी क्लब येथे आयोजित या रानभाजी महोत्सवास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्घाटनापूर्वीच रानभाज्या खरेदीसाठी लोकांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली होती. महोत्सवात करटोली, फांग, बांबूचे कंद, केळीचे फूल‌ या रानभाज्या आकर्षण ठरल्या. रानमेथी, गुडवेल, म्हशोला, काया कळूची साल, अर्जुन सारळ्या, कळसागाची पाला, जंगली कांदा, ओवा, दूधी शेंग, मिस्वाक लकडी, शतावरी, चाकवत, काटेमाठ, कुरडू, तरोटा यासह इतर विविध २० पेक्षा अधिक रानभाज्यांचा समावेश महोत्सवात होता. या महोत्सवाच्या यशस्वितेसाठी श्रीकांत झांबरे, देविदास कोल्हे तसेच सर्व तालुक्यातील सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी परिश्रम घेतले.

Next Post
बॅडमिंटन असोसिएशनचा संघ ठाण्याला रवाना

बॅडमिंटन असोसिएशनचा संघ ठाण्याला रवाना

ताज्या बातम्या

जळगावात जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा; पाच ज्येष्ठ फोटोग्राफरांचा सत्कार
गुन्हे

जळगावात जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा; पाच ज्येष्ठ फोटोग्राफरांचा सत्कार

August 19, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिवस साजरा
Uncategorized

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिवस साजरा

August 19, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले

August 19, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
खान्देश

डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी

August 19, 2026
जळगावात वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव; मलाबार गोल्ड अन् प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचा उपक्रम
जळगाव जिल्हा

जळगावात वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव; मलाबार गोल्ड अन् प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचा उपक्रम

August 19, 2026
शिरसोलीतील घरफोडीचा छडा; एमआयडीसी पोलिसांकडून तीन संशयित ताब्यात
खान्देश

शिरसोलीतील घरफोडीचा छडा; एमआयडीसी पोलिसांकडून तीन संशयित ताब्यात

August 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add