• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशन व क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

नविन शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाचे विद्यार्थीही अभ्यासणार महात्मा गांधीजींचे तत्वज्ञान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 28, 2023
in शैक्षणिक
0
गांधी रिसर्च फाऊंडेशन व क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

जळगाव, दि.२८ – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहांतर्गत गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात गुरूवारी महत्त्वाचा सामंजस्य करार झाला. या कराराद्वारे शैक्षणिक, संशोधन आदान-प्रदान, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आदींचा समावेश आहे. याअंतर्गत विद्यापिठातील विद्यार्थ्यांना गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या उपक्रमांमधे सहभागी होता येणार आहे.

महात्मा गांधीजींची विचारधारा यांचा प्रचार-प्रसारासाठी पीजी डिप्लोमा, संपोषित ग्रामीण पुर्ननिर्माणासाठी स्नातकोत्तर डिप्लोमा, संघर्ष परिवर्तनवर कार्यशाळा, युवा पिढीचे नेतृत्व निर्माण करण्यासाठी नॅशनल गांधीयन लिडरशीप कॅम्प, आंतरराष्ट्रीयस्तरावर शांती व अहिंसेच्या संदर्भात विंटर स्कूल, संशोधनासाठी वेगवेगळे इंटर्शनशिप, फेलोशिप, महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित प्रदर्शन यांच्यासह गांधी विचार संस्कार परिक्षा, ग्रामविकास असे विविध उपक्रम गांधी रिसर्च फाऊंडेशन राबवित असते.

या सर्व उपक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील विद्यार्थ्यांनाही यात संधी निर्माण होणार आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनने यापूर्वी अमेरिकेतील एरिझोना स्टेट विद्यापीठ, मेक्सिकोमधील सायंटिस विद्यापीठ, महात्मा गांधीद्वारा स्थापित गुजरात विद्यापीठ अहमदाबाद, इटली येथील पीस फाऊंडेशन आदींमधे यापूर्वी सामंजस्य करार केलेले आहेत. या श्रृखंलेत आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा समावेश झाला आहे.

या करारावर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च डीन प्रो. डॉ. गिता धर्मपाल यांनी तर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या, यावेळी विद्यापिठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे व संचालक डॉ. राजेश जावळेकर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने वरिष्ठ सल्लागार व विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, समन्वयक उदय महाजन, असोसियट प्रोफेसर डॉ. अश्विन झाला उपस्थित होते. विद्यापीठातर्फे प्रा. ए. एम. महाजन, प्रा. सतीष कोल्हे, प्रा. डी. एच. मोरे, प्रा. पी. पी. माहुलीकर, डॉ. विकास गिते, प्रा. प्रविण पुराणीक, प्रा. उमेश गोगडीया, प्रा.दीपक सोनवणे, सीए. रवींद्र पाटील, पीआरओ डॉ.सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Next Post
पावसाळी अधिवेशनात जळगावसाठी १५ कोटी निधी मंजूर | आ.सुरेश भोळे प्रयत्नांना यश

पावसाळी अधिवेशनात जळगावसाठी १५ कोटी निधी मंजूर | आ.सुरेश भोळे प्रयत्नांना यश

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group