जळगाव, दि.२३ – आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्था आणि आ. सुरेश भोळे यांच्या कार्यालयीन सहकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील सरस्वती नगरात रेशन कार्ड व मतदान कार्ड मोहिमेचे आज रविवारी शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमास आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सदर मोहीम २३ जुलै ते २६ जुलै पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहीमेचा पुढाकार आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अर्चना पाटील, संजय पाटील, ललित चौधरी, गुणवंत झोपे, वर्षा झोपे यांच्या पुढाकाराने झाले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या मंडल क्रमांक ३ चे अध्यक्ष विजय वानखेडे, सरचिटणीस किसान मराठे, बंटी भारंबे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.