• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज

जैन हिल्स येथे फालीच्या पहिल्या टप्प्याचा समारोप; विद्यार्थ्यांकडून कृषीवर सादरीकरण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 4, 2023
in कृषी, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज

जळगाव, दि.०३ – शेतीचे भवितव्य संकटात येते तेव्हा भूमिपुत्रच शेतीला विकतो हे वास्तव आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञान शेतीत वापरले तर ती शाश्वत होते. भारताच्या समृद्धीचे कणखर नायक तुम्ही आहात. ठिबक, शेडनेट व इतर संशोधनाची मदत घेऊन शाश्वत शेतीची कास धरली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि उज्ज्वल भारत घडेल असे प्रतिपादन गोदरेज उद्योग समूहाचे अध्यक्ष नादिर गोदरेज यांनी केले.

जैन हिल्स येथे फ्युचर अॅग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया (फाली) उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्याच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांशी त्यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी, निमित दोशी, दिलीप कुलकर्णी, रवींद्र पाटील, अमोल कदम, सुरज पानपत्ते, मुनेष सक्सेना, जितेंद्र गोरडे, इमरान खान, अशोक पटनायक, बळवंत धोंगडे, जिग्न्यासा कुर्लपकर, शैलेंद्र सिंह, डॉ. बी. के. यादव, डॉ. अनिल ढाके, डॉ. आर. एस. मसळी, डोमेनिक फर्नांडीस, आशीष गणपुले, अजय शेठ, शशीकांत हांडोरे हे प्रायोजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धेकांच्या ट्रॉफी, मेडल देऊन गौरव करण्यात आला.

गुजरात, महाराष्ट्रातील १५५ शाळांमधील १०८५ शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तीन सत्रांत हा उपक्रम होणार आहे. यंदाचे हे ननवे वर्ष आहे. गुरुवारी पहिले सत्र सुरू झाले. शुक्रवारी विविध कृषी व्यवसाय व यंत्रांचे सादरीकरण जैन हिल्स येथे झाले. कृषी व्यवसायाबाबत ६१ प्रतिमाने तर ६१ कृषी यंत्रही विद्यार्थ्यांनी सादर केले. पारितोषिक वितरण समारंभावेळी कंपनी प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त केले.

फालीमधील यशस्वी झालेल्या १० विद्यार्थ्यांना प्रायोजक कंपनांतर्फे शिष्यवृत्ती व व्यवसाय वृद्धीसाठी आर्थिक मदत देण्यात आली. त्यात गोदरेज अॅग्रोवेटने विशाल माळी (नाशिक), रोहन रानवारे (पुणे), जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. ने लोकेश देसले (नंदुरबार), अक्षय चांदुरकर (नागपूर), यूपीएल ने शिवांजली पवार (नंदुरबार), विवेक वरूळे (कोल्हापूर), ओमनीवर ने रागिनी फरकाळे (नागपूर), ईश्वरी बोडके (नाशिक), रॅलीस इंडिया ने श्रद्धा शिरके (सातारा), स्नेहा शिंगाडे (कोल्हापूर) यांच्यापैकी तिघांनी प्रातिनीधीक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्ष नौटीयाल, रोहिणी घाटगे यांनी केले. नॅन्सी बेरी यांनी आभार मानले.

बिझनेस प्लॅन सादरीकरण स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकाचे स्पर्धक पुढीप्रमाणे..
फिंगर मिलेट प्रॉडक्ट, हिरकणी विद्यालय गावडेवाडी जिल्हा पुणे (प्रथम क्रमांक), इंडियन गोसबेरी सेलेब्रशन, कुलस्वामिनी केंद्रीय विद्यालय हिवरे जि. पुणे (द्वितीय), राजगिरा चिक्की, श्री. पंढरीनाथ विद्यालय पोखरी पुणे (तृतीय), ऑरेंज बायप्रॉडक्ट, जिजामाता हायस्कूल आणि जूनियर कॉलेज खपा जि. नागपूर (चौथा क्रमांक) आणि पाचवा क्रमांक टमरीन बायप्रॉडक्ट, प्रकाश हायस्कूल मालेगाव जि. नागपूर

इनोव्हेशन स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकाचे स्पर्धक पुढीप्रमाणे..
ट्रायसिकल अॅग्रीकल्चर इम्प्लिमेंट, श्रीराम विद्यालय नांदगोमुख जि. नागपूर (प्रथम), फर्टीलायझर अॅप्लीकेशन मशीन, अनुसयाबाई भालेराव माध्यमिक विद्यालय नाशिक (द्वितीय), मल्टीपर्पज फार्म मशीन, श्रीमती राधाबाई शिंदे हायस्कूल हस्ता, संभाजीनगर (तृतीय), ओनियन कटर व ग्रेडिंग मशीन- स्वामी प्रणवानंद सरस्वती हायस्कूल कालीमठ जि. संभाजीनगर (चतुर्थ), व्हेंटीलेशन सिस्टिम्स इन ओनियान स्टोअरेज स्ट्रक्चर – कुलस्वामीनी केंद्रीय विद्यालय हिवरे जि पुणे यांचा पाचवा क्रमांक आला.

Next Post
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना (ठाकरे गट) तर्फे होऊ द्या चर्चा अभियानाची तयारी सुरू
जळगाव जिल्हा

शिवसेना (ठाकरे गट) तर्फे होऊ द्या चर्चा अभियानाची तयारी सुरू

September 19, 2023
जळगाव ओपन बॅडमिंटन  स्पर्धा २०२३ उत्साहात संपन्न
क्रिडा

जळगाव ओपन बॅडमिंटन  स्पर्धा २०२३ उत्साहात संपन्न

September 19, 2023
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालया मध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठापना
जळगाव जिल्हा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालया मध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठापना

September 19, 2023
शिंपी समाज हितवर्धक संस्था व अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव जिल्हा

शिंपी समाज हितवर्धक संस्था व अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 17, 2023
शेती, पाणी यातुनच महानोर दादांशी ऋणानुबंध – अशोक जैन
जळगाव जिल्हा

शेती, पाणी यातुनच महानोर दादांशी ऋणानुबंध – अशोक जैन

September 16, 2023
ना.धों.महानोर यांच्या जयंतीनिमित्त जळगावात ‘हा कंठ दाटूनी आला’ स्वरांजली कार्यक्रम
जळगाव जिल्हा

ना.धों.महानोर यांच्या जयंतीनिमित्त जळगावात ‘हा कंठ दाटूनी आला’ स्वरांजली कार्यक्रम

September 15, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.