• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुभूती निवासी स्कूलचा यंदाही १०० टक्के निकाल

सीआयएससीई बोर्डच्या १२ वी व १० वी च्या परिक्षेत विद्यार्थ्यांचे यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 14, 2023
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
अनुभूती निवासी स्कूलचा यंदाही १०० टक्के निकाल

जळगाव, दि.१४ – दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससी व इयत्ता १० वी आयसीएसईचा निकाल जाहिर झाला. यात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सोळा वर्षापासून १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली. अनुभूती स्कूलमधून १२ वीच्या काॕमर्स शाखेतून हेमंत अग्रवाल ९३.२५ टक्के तर विज्ञान शाखेतून प्रियम संघवी ८९ टक्के गुणांसह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. तर इयत्ता दहावीत मती भंडारी ही ९२.८० टक्के गुणांसह प्रथम आली. पहल अग्रवाल ही विद्यार्थीनी ९२.४० टक्क्यांसह द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. अनुभूती निवासी स्कूलमधून दहावीसाठी ३० तर बारावीसाठी १८ विद्यार्थी परिक्षेत सहभागी झाले होते.

अनुभूती स्कूलला एज्युकेशन वर्ल्ड दिल्ली व एज्युकेशन टुडे बेंगलूर या देशातील शिक्षण क्षेत्रात नामांकित रेटिंग एजन्सींनी यावर्षी महाराष्ट्रातून पहिला क्रमांक तर संपूर्ण भारतामध्ये अग्रस्थानी नामांकित केले आहे. संस्थापक भवरलालजी जैन यांनी भारतीय संस्कृती पुढच्या पिढीला संस्कारीत व्हावी, एकमेकांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण व्हावे यादृष्टीने अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई या पॅटर्नची खान्देशातील एकमेव शाळा आहे. सामाजिक जाणिवेसह संवेदनशील नागरीक घडावे यासाठी विद्यार्थ्यांवर शाळेत पाचवी पासूनच विशेष लक्ष दिले जाते.

शालेय अभ्यासक्रमाच्या शिक्षणासमवेत विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे संस्कार दिले जातात यासाठी जागतिक पातळीवरच्या विविध तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. ग्रीनस्कूल म्हणून ख्याती असलेल्या या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांवर व्यक्तिगत लक्ष, प्रशस्त ग्रंथालय, तज्ज्ञ शिक्षकांसह विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्याकडून अभ्यासाबरोबरच छंद जोपासले जातात. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास होण्यास मदत होते. वर्षभर शिक्षक व शिक्षकतेतर सहकाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झाले. अनुभूती स्कूलच्या संचालक मंडळातील अशोक जैन, अतुल जैन, निशा अनिल जैन व प्राचार्य देबासिस दास यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गैरसोयी बाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस निवेदन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गैरसोयी बाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस निवेदन

ताज्या बातम्या

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा
जळगाव जिल्हा

‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

July 22, 2026
कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add