जळगाव, दि. २७ – शहरातील विठ्ठल पेठ भागातील रहिवाशी असलेल्या अपंग बंधवाला रोटरी मिट डाऊन तर्फे मदतीचा हात देण्यात आला. काही दिवसांपूर्वी जळगाव शहरात वादळ आलं होतं. या वादळात झाड पडल्याने एका अपंग इसमाचे गाडीचे नुकसान झाले होते.
सुनील रामचंद्र सरोदे असे नुकसान ग्रस्त अपंग व्यक्तीचे नाव असून संबंधित व्यक्तीला मदत करावी अशी मागणी समाजातर्फे करण्यात येत होती. यासाठी जळगाव शहरातील दानशूर व्यक्तींनी स्वतःहून पुढाकार घेत सरोदे यांना पाच हजार रुपयांची मदत केली.
सुनील सरोदे हे गोळ्या बिस्कीट विकून आपला उदरनिर्वाह करीत असून त्यांची परिस्थिती हालाखीची आहे. यासाठी रोटरी कक्लब चे माजी अध्यक्ष ॲड. महेंद्र सोमा चौधरी यांच्या तर्फे त्यांना आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी आर व्ही देशमुख, उषा शर्मा, सुरबाला महेंद्र चौधरी प्रशांत सुरळकर आदी उपस्थित होते.