जळगाव, दि. २७ – भारत देशाला ऑलिम्पिक खेळात तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कुस्तीमध्ये पदक मिळवून भारताचे नाव अजरामर करणाऱ्या सात महिला खेळाडू सोबत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष यांनी अन्याय केला असल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा नोंदवून चौकशी करण्यात यावी यासाठी महिला कुस्तीच्या खेळाडू दिल्ली येथे धरणे आंदोलनाला बसले असून त्यांना जळगावातील इतर पुरुष व महिला खेळाडूंनी पाठींबा दिला आहे.
दरम्यान जळगाव जिल्हा विविध क्रीडा संघटनाचे पदाधिकारी तथा क्रीडा संघटनाचे मार्गदर्शक फारूक शेख यांच्या नेतृत्वात हॉकी व फुटबॉल महिला व पुरुष खेळाडूंनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत भारताच्या महामहीम राष्ट्रपती व पंतप्रधान यांना निवेदन दिले.
महिला पैहलवान सोबत झालेल्या अन्याय अत्याचारा बाबत कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाला त्वरित अटक करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी एक मुखी मागणी करण्यात आली. यावेळी रोशनी ठाकूर, फारुख शेख, सत्यनारायण पवार यांच्यासह महिला व पुरुष खेळाडू उपस्थित होते.