जळगाव, दि.१० – येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची दोन वर्षाची एप्रिल २०२३ – मार्च २५ ची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच निरीक्षकांच्या उपस्थितीत एकमताने निवड करण्यात आली आहे. यात जिल्हाध्यक्षपदी नेमिवंत धांडे यांचेसह जिल्हा कार्याध्यक्षपदी पाचोरा येथील रवींद्र युवराज चौधरी यांची तर जिल्हा प्रधान सचिव म्हणून सुनील हिरालाल वाघमोडे, प्रल्हाद रामधन बोऱ्हाडे, विश्वजीत दगडू चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. आगामी काळात शाखावाढीसह संघटनात्मक वाढविस्तारावर भर दिला जाईल अशी माहिती नवीन कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी दिली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या ३४ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात समाजसुधारकांचा वारसा यशस्वीपणे चालवीत आहे. समितीची एप्रिल २०२३ ते मार्च २०२५ ची दोन वर्षाची कार्यकारिणी नियुक्ती जिल्हा प्रेरणा व संकल्प मेळाव्यात एकमताने करण्यात आली. यावेळी निरीक्षक म्हणून राज्य सरचिटणीस विनायक सावळे, राज्य पदाधिकारी प्रा. डी. एस. कट्यारे हे उपस्थित होते. यावेळी मागील कार्यकारिणीचा आढावा मावळते प्रभारी कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी घेतला.
यानंतर एकमताने निरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यात आली. यात नूतन कार्याध्यक्ष म्हणून रवींद्र चौधरी यांना पुनर्संधी देण्यात आली. तर जिल्हा प्रधान सचिव म्हणून विश्वजित चौधरी (जळगाव) आणि सुनील वाघमोडे (अमळनेर) यांची फेरनिवड तर प्रल्हाद बोऱ्हाडे (जामनेर) यांचीही निवड करण्यात आली आहे. जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून नेमिवंत धांडे यांची तर उपाध्यक्ष म्हणून पाचोरा येथील माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, भुसावळ येथील सेवानिवृत्त अभियंता रवींद्र बावस्कर आणि जामनेर येथील माजी मुख्याध्यापक नाना लामखेडे यांची निवड झाली.
इतर कार्यकारिणी : बुवाबाजी विभाग – अरुण दामोदर (भुसावळ), विविध उपक्रम विभाग – ज्ञानेश्वर कोतकर (पाचोरा), वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प – अशोक तायडे (जामनेर), महिला सहभाग कार्यवाह – सुनीता वसंत चौधरी (जामनेर), युवा सहभाग – सागर बहिरुणे (भुसावळ), कायदेविषयक सल्लागार तथा जातपंचायत विभाग – ऍड. भरत गुजर (जळगाव), प्रशिक्षण विभाग – प्रा. दीपक मराठे (भडगाव), पत्रिका व प्रकाशन विभाग – शिरीष चौधरी (जळगाव), विज्ञान बोध व विवेक वाहिनी – प्रा. आर. एस. पाटील (एरंडोल), जोडीदाराची विवेकी निवड विभाग – मिनाक्षी चौधरी (जळगाव), सोशल मीडिया व्यवस्थापन – फिरोज खान (भडगाव), सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग- जितेंद्र महाजन (धरणगाव)