जळगाव, दि.०७ – शहरासह जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ईमदाद फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असून सामाजिक कार्यकर्ते ॲड.जमील देशपांडे यांची फाउंडेशनच्या अध्यक्षपदी तर सचिव पदी मो.आरिफ देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली.
समाजाच्या प्रत्येक घटकातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर ईमदाद फाउंडेशन कार्य करणार आहे. ईमदाद या शब्दाचा अर्थ मदत असा असून त्याच अर्थाने शिक्षण, आरोग्य, रोजगार, राष्ट्रीय एकात्मता, कायदे विषयक ज्ञान या बाबत समाजात जनजागृती अभियान राबविण्यात येतील.
ईमदाद फाउंडेशन तर्फे ईमदाद मोहल्ला क्लिनिक, ईमदाद स्टडी सेंटर, ईमदाद अनाज बँक, ईमदाद कुशल रोजगार योजना, ईमदाद मेहमान घर, ईमदाद खाना घर अशा विविध सेवा सुविधा समाजातील गरजू नागरिकांकरीता सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या देणगीमधून सर्व सेवा कार्य पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
ईमदाद फाउंडेशन ची कार्यकारिणी पुढील प्रमाणे..
प्रमुख मार्गदर्शक शकील देशपांडे, अध्यक्ष- ॲड.जमील देशपांडे, सचिव- मो.आरिफ मो.जाहिद देशमुख, उपाध्यक्ष- मतींन शब्बीर पटेल, विश्वस्त- असिफ गेशुमिया देशपांडे, तौसिफ शकील देशपांडे, रमिझ करीम देशमुख, जुबेर जमील देशपांडे