लालसिंग पाटील | भडगाव, दि. ०७ – कजगाव येथे शिवसेनेच्या वतीने पाचोरा भडगाव बाजार समिती निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शुक्रवारी सहकार मेळाव्याचे आयोजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सहकार मेळावा घेण्यात आला.
आगामी काही दिवसांनी होत असलेल्या पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने कजगाव पासर्डी रस्त्यावरील जिनिंग परीसरात या सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दरम्यान आमदार किशोर पाटील यांनी उपस्थितांना विविध विषयांवर मार्गदर्शन करताना कृषी उत्पन्न बाजार समितीवर भगवा फडकवण्याचा संकल्प केला.
यावेळी जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती विकास पाटील, माजी नगरअध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा बँक संचालक प्रताप पाटील, युवराज पाटील, उपजिल्हा प्रमुख डॉ. विशाल पाटील, गणेश पाटील, देविदास माळी, तालुका प्रमुख संजय पाटील, लखीचंद पाटील, वसंत पाटील, मोहन पाटील, खुमानसिंग पाटील, जयंत पाटील, संजय पाटील, राहुल पाटील, सुनील पाटील, विश्वास पाटील आदींसह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, व पदाधिकारी उपस्थित होते.