जळगाव, दि. ३१ – सार्वजनिक श्रीराम उत्सव समिती तर्फे गुरूवारी श्रीराम नवमी निमित्त शहरातुन मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान मिरवणुक शहरातील जामा मशिद येथे आल्यानंतर जामा मशिदचे ट्रस्टी सैय्यद चांद सैय्यद आमीर, माजी नगरसेवक खालिद बागवान, समाजवादी पार्टीचे रईस बागवान यांच्यासह मुस्लिम बांधवांनी हजर राहुन श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन नारळे व मिरवणुकीतील कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ देवुन रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडले.
यावेळी आमदार सुरेश भोळे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्ष विजयकुमार ठाकुरवाड, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे, शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.