जळगाव, दि. ०७ – येथील विद्या इंग्लिश स्कुल तर्फे सोमवारी पारंपरिक होळी दहन करण्यात आले. युवा उद्योजक श्रीहरी मराठे यांच्या हस्ते पूजा करून होळी दहन करण्यात आले. सदर होळी पूर्णतः या पर्यावरण पूरक असून होळीचे हे २३ वे वर्ष आहे.
या प्रसंगी विद्या इंग्लिश स्कुल चे अध्यक्ष विजय वाणी, मराठी प्रतिष्ठान अध्यक्ष ॲड.जमील देशपांडे, रमेश पहेलानी, दिलीप काशीकर, प्रमोद जोशी, संतोष क्षीरसागर, रफिक पिंजारी, प्रकाश काबरा, एस.आर. पाटील, भरत नन्नवरे, अनिल वावरे, मराठी प्रतिष्ठानच्या संध्या विजय वाणी, कंचन जयदीप यांचेसह परिसरातील नागरिक, महिला भगिनी उपस्थित होत्या.