जळगाव, दि.२३ – कोळी महासंघाची जिल्हा बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्याची नवीन कार्यकारणी तयार करण्यात आली. दरम्यान कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महारष्ट्र विधान परिषदचे आमदार रमेश पाटील यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्याची नवीन कार्यकरणी तयार करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सैदाणे, जिल्हा युवाध्यक्ष मुकेश सोनवणे, यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील पद्मालय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली असून अनेक विषयावर विचार विनीमय करून चर्चा करण्यात आली. दरम्यान बैठकीत अनेकानी आपले विचार मांडले. बैठकीला जिल्हाभरातून पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सुभाष सोनवणे, संदीप कोळी, नितीन कांडेलकर, हरिलाल कोळी, मोहन शंखपाळ, अरुण इंगळे, बंडू कोळी, भरत पाटील, विशाल सपकाळे, रतिलाल कोळी, महेंद्र सपकाळे, प्रकाश बोरसे, संतोष कोळी, भगवान सोनवणे, दत्तात्रय सोनवणे, देविदास कोळी, सहदेव कोळी, सुनील कोळी, संजय नन्नवरे, विनायक कोळी, सचिन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.