• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनचा कृषी तंत्रज्ञान आणि संशोधन अभ्यास दौरा

राज्यभरातील शेतकरी देत आहेत भेट

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 10, 2023
in कृषी, जळगाव जिल्हा
0
जैन इरिगेशनचा कृषी तंत्रज्ञान आणि संशोधन अभ्यास दौरा

जळगाव, दि.१० – जैन इरिगेशनच्या जैन हिल्स वरील कृषी संशोधन विकास केंद्रावर राज्यभरातील निमंत्रीत शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यात राज्यभरातील व मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांमधील हजारो शेतकरी जैन हिल्सच्या कृषी संशोधन आणि प्रात्याक्षिक परिक्षेत्रावर भेट देत आहेत. आपल्या कष्टाला निरीक्षणातून तंत्रज्ञानाची जोड देत आहेत.

जैन हिल्सवर आंतरराष्ट्रीय कांदा व लसूण परिषद दि. ११ ते १४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर दि. ५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे. परिषदेच्या चार दिवस पंचक्रोषीतील निमंत्रीत शेतकऱ्यांनी जैन तंत्रज्ञान अभ्यासणे अपेक्षित आहे. जैन हिल्सच्या प्रात्यक्षिक परिक्षेत्रावर खरिप आणि रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या ८२ प्रकारच्या विविध कांदाच्या जातींची लागवड करण्यात आली आहे.

ड्रीप, मायोक्रो स्प्रिंकलर, रेनपोर्ट, रेनपाईपचा सिंचनासाठी केलेला वापर, यातून बहरलेली कांदा शेती शेतकरी अभ्यासत आहेत. सौर पंपाद्वारे पाणी पुरवठा करताना विहिरीवरील उघड्या जागेचा वापर करताना शेतकऱ्याचे हित कसे साधले जाईल, हे दाखविण्यात आले आहे. जैन ऑटोमेशनद्वारे फर्टिगेशन यंत्रणा, जैन न्युट्रीकेअर यंत्रणा कशी राबविता येईल. यातून वॉटर सोल्युबल खते देऊन शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीचा मार्ग कृषीतज्ज्ञ सांगत आहेत. पाणी व खते हे जमिनीस न देता पिकांना दिले पाहिजे यासाठी ठिबक सिंचनाच्या वापरातून खतांची कार्यक्षमता वाढत असते असे शेतकरी समजून घेत आहेत.

केळीच्या जवळपास ३४ प्रकारच्या विविध जातींचा संशोधात्मक लागवड त्याला रानटी जनावरांपासून पिक संरक्षण कसे करता येईल, याची यंत्रणाही पाहता येत आहे. ग्रॅण्डनाईनमधील निवडक १४ जातींची लागवड याठिकाणी पाहता येईल. यातून शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंतीस उतरलेली टिश्यूकल्चर जैन ग्रॅण्डनाईन केळीसह इलाकी, पूवन, बन्थल मोन्थन, नेन्द्रन, रेड बनाना या टिश्यूकल्चरचा बाग शेतकऱ्यांना अभ्यासला. जैन स्वीट ऑरेंजच्या पाचही व्हरायटी यासह चिकू, पेरू, भगवा डाळिंब यासह अतिसघन लागवड पद्धतीने आंबा शेतीच्या फळबाग व्यवस्थापनातून समृद्धीचा मार्ग शेतकरी पाहत आहेत.

अत्याधुनिक कांदा पेरणी यंत्र, कांदा काढणी यंत्र, बी लागवड यंत्र यासह कृषी उपयुक्त अवजारांची माहिती शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत आहे. भविष्यात वाढती लोकसंख्या व उपजाऊ जमिनीचे घटत असलेले क्षेत्र पाहता भविष्यातील शेतीउपयुक्त जमिन कमी होऊ शकते. यासाठी भविष्यातील शेती, फ्युचर फार्मिंग शेतीकरी अभ्यासत आहेत. यामध्ये भाजीपालासह औषधी वनस्पतींचे उत्पादने घेण्यासाठी भिंतीवरची शेती म्हणजे व्हर्टीकल फार्मिंग, हायड्रोपोनीक शेती म्हणजे पाण्यातील शेती, एरोपोनीक शेती म्हणजे हवेत शेती, माती विरहीत शेती, वातारवण नियंत्रीत शेती पाहुन शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा मार्ग मिळत आहे. अभ्यास दौरामध्ये आकाश मैदानावर शेतकरी व जैन कृषितज्ज्ञ यांच्यामध्ये प्रश्नोत्तरांचे सत्र होत असते. यात बघितलेले तंत्रज्ञानाविषयी शेतकरी आपल्या शंकांचे निरसण करत आहे.

जैन टिश्यूकल्चरमध्ये ग्रॅण्ड नाईन जातीमध्ये नंबर एक असलेला जैन टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा येथील १२५ एकर क्षेत्रात विस्तारित असलेल्या पॉलिहाऊस, ग्रीन हाऊसमध्ये केळी व डाळिंब टिश्यूकल्चर प्रायमरी हार्डनिंग, सेकंडरी हार्डनिंग त्यानंतर सर्व जातीवंत फळबागांसाठी लागणारे रोपे, कलमे त्यात प्रामुख्याने आंबा, जैन स्वीट ऑरेंज, पेरू, सिताफळ यासह भाजीपाल्याची रोपे यात प्रामुख्याने पपई, मिरची, कांदा, टोमॅटो, सॉईललेश बटाटा यांचे प्रात्याक्षिक शेतकरी अनुभवत आहेत

 


Next Post
सर्वसमावेशक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षस्थानी साधना गिरीश महाजन यांनी निवड

सर्वसमावेशक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षस्थानी साधना गिरीश महाजन यांनी निवड

ताज्या बातम्या

जळगाव मनपा आरक्षण सोडतः ‘ड’ प्रभाग सर्वसाधारण, प्रस्थापितांना दिलासा!
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा आरक्षण सोडतः ‘ड’ प्रभाग सर्वसाधारण, प्रस्थापितांना दिलासा!

November 11, 2025
गोळीबार प्रकरण: पोलिसांना कुंटणखान्याची टीप दिल्याच्या संशयावरून गोळीबार!
खान्देश

गोळीबार प्रकरण: पोलिसांना कुंटणखान्याची टीप दिल्याच्या संशयावरून गोळीबार!

November 11, 2025
मेहरुणमध्ये ‘हरिनाम सप्ताह’ व ‘ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्याचा भक्तिमय प्रारंभ
जळगाव जिल्हा

मेहरुणमध्ये ‘हरिनाम सप्ताह’ व ‘ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्याचा भक्तिमय प्रारंभ

November 10, 2025
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिराचा समारोप
जळगाव जिल्हा

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिराचा समारोप

November 10, 2025
जळगावात गोळीबार: एकाचा मृत्यू, दोन जखमी; हद्दपार आरोपीकडून गोळीबार
खान्देश

जळगावात गोळीबार: एकाचा मृत्यू, दोन जखमी; हद्दपार आरोपीकडून गोळीबार

November 10, 2025
ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!
खान्देश

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

November 8, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group