धरणगाव, दि. ०८ – अहिराणी गीत प्रसिद्ध गायक नवल माळी यांचे शनिवारी तालुक्यातील वंजारी खपाट अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी गायलेले ‘साली नंबर वन् ‘ हे अहिराणी गीत प्रचंड गाजले व आजही डीजे वर अनेक तरुण थिरकतांना दिसतात.
मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेल्स मध्ये ह्या गीतावर हौशी लोक नाचत असत. गुजरातच्या अहमदाबाद, सुरत व बडोदा शहरात ह्या गीताच्या सिडी, कॅसेटच्या विक्रीने उच्चांक गाठला होता. नवल माळी याचे अहिराणीमध्ये फार मोठे योगदान होते. त्यांनी शेकडो अहिराणी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.
आज अहिराणीत योगदान असलेला अहिराणीचा खरा कलावंत गेल्याचे दुःख अनेक अहिराणी कलावंतांमध्ये आहे.नवल माळी यांची परिस्थिती खूप नाजूक होती, प्रचंड काम करूनही अहिराणी कलावंतांची झोळी खाली राहिली. अशोक चौधरी सरांच्या अनेक अहिराणी चित्रपटात नवलजी हमखास असायचे.
News Source- Tushar Waghulde, Facebook wall